औरंगाबाद

गंगापुरात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांचा नागरी सत्कार

गंगापुर/प्रतिनिधी

गंगापुरात केंद्रीय अर्थ राज्य मंत्री भागवत कराड यांचा नागरी सत्कार करण्यात आला. शहरातील शिवकृपा मंगल कार्यालय येथे केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित केला होता. या प्रसंगी गंगापुर खुलताबाद तालूक्याचे आमदार प्रशांत बंब, प्रदेश कार्यकारिणी सदस्य किशोर धनायत, जिल्हाध्यक्ष विजय औताडे, माजी महापौर बापू घडामोडे, जिल्हासरचिटणीस लक्ष्मण औटे, तालुकाध्यक्ष शिवनाथ मालकर, यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी आमदार प्रशांत बंब यांनी गंगापुर तालुक्याच्या विविध प्रश्नाला न्याय देण्यासाठी मंत्री महोदयाकडे आग्रही मागणी केली तसेच किशोर धनायत यांनी नगरपालिकेच्या क्रीडांगणासाठी व जलतरण तलावासाठी आपल्या भाषणातून निधीची मागणी केली, तसेच रेल्वेच्या कामास गती देऊन लोहमार्ग त्वरित सुरु करावा व गंगापुरचे पोस्ट ऑफिस जुन्या गावातील नवीन गावात स्थलांतरित करावे अशी मागणी केली. सत्काराला उत्तर देतांना भागवत कराड यांनी साहेबांनी सांगितले की, मोदीजींनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी सार्थपणे व यशस्वीपणे पार पाडेन देशभरातील नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन तसेच साडेतीनशे कोटींची गॅस पाईपलाईन नगर ते औरंगाबाद मंजूर करून आणली तिचे हि काम युद्धपातळीवर चालू आहे त्या पाईपलाईन मधून गंगापुर वासियांना सुद्धा गॅस कनेक्षण देण्यात येईल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास महाराष्ट्र शासनाला सुचविण्यात येईल पीक विम्याचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल सुशिक्षित बेरोजगार व नवीन उद्योजक यांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी भरीव अशी मदत करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला याप्रसंगी प्रास्ताविक जे बी पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवनाथ मालकर यांनी केले याप्रसंगी तालुका सरचिटणीस अशोक मंत्री, युवा मोर्चा शहर अध्यक्ष वैभव धनायत,स्वप्नील डिके,शहर अध्यक्ष मारोती खैरे, नगरसेवक प्रदीप पाटील, शहर सरचिटणीस प्रशांत मुळे, अमोल शिंदे, रामभाऊ काळे, सचिन गिर्हे, संतोष काळे, शरद रावते ,नाना करे, मधुकर वालतुरे, सुरेश शिंदे, जनार्धन गांधिले, विलास जगताप, सराफ सुवर्णकार संघटना पदाधिकारी, आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close