औरंगाबाद

समाजाच्या विकासासाठी आपल्या मुलांनी स्पर्धा परीक्षेत भाग घेतला पाहिजे – माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे

वाळूजमहानगर / प्रतिनिधी

मातंग समाजाचा विकास करायचा असेल तर समाजातील तरुणांनी स्पर्धा परीक्षेत सहभागी होऊन प्रशासनातील उच्चपदस्थ जागांवर जाणे गरजेचे आहे. ज्या समाजातील जास्तीत जास्त लोक प्रशासनातील उच्च पदावर जातील त्या समाजाचा विकास झाला असे दिसून येते. याशिवाय समाजाला विकास गाठायचा असेल तर त्यांनी राजकारणात सहभागी होऊन आपली ताकद दाखवली पाहिजे तरच आपल्या मातंग समाजाचा विकास होईल असे प्रतिपादन बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे यांनी बजाजनगरातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सामाजिक सभागृहात आयोजित नवनिर्धार संवाद अभियान कार्यक्रमात बोलताना केले.

यावेळी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अर्जुन गालफाडे, बहुजन रयत परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश गालफाडे, महिला प्रदेशाध्यक्ष कोमलताई साळुंखे, उपाध्यक्ष रमेश पाटू, राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे प्रदेश महासचिव मारुती गायकवाड, जिल्हाध्यक्ष विलास सौदागर, युवा जिल्हाध्यक्ष सोमनाथ गालफाडे, मच्छिंद्र पुलावळे, ईश्वर शिरसागर, बबन गायकवाड, प्रमोद साळुंखे, लहुजी सैनिक संघाचे संस्थापक अध्यक्ष रतन शेलार, जितेंद्र गालफाडे, मंडळाचे गोविंद शिंदे, पांडुरंग बारस्कर, आत्माराम भोसले, प्रकाश भोसले आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अर्जुन गालफाडे म्हणाले की समाजाच्या नावावर अनेक कार्यकर्ते मोठे नेते झाले मात्र समाजाचे त्यांनी घोर उपेक्षा केली आहे. नेता मोठा झाल्यानंतर त्यांनी समाजातील कार्यकर्त्यांना कधीच मोठे होण्याची संधी दिली नाही किंवा मोठे केले नाही त्यामुळे समाजाचा विकास झाला नाही यामुळे नेते आणि समाज यांच्यात अंतर वाढत गेले आपल्याला आपल्या समाजाचा विकास करायचा असेल तर नेत्यांनी आपल्या समाजातील कार्यकर्त्यांशी जवळीक साधून त्यांच्या अडचणी समजून त्यांना मोठे केले पाहिजे तरच खऱ्या अर्थाने समाजाचा विकास होऊ शकतो. तसेच समाजाचा ठाण्या वाघ रमेश गालफाडे यांनी समाजासाठी मोठे काम हाती घेतले आहे त्यांच्या या कामासाठी आणि पक्ष आणि राजकारण बाजूला ठेवून आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी राहुन खंबीरपणा ने साथ देऊ असे अर्जुन गालफाडे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बहुजन रयत परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश गालफाडे म्हणाले की मी महाराष्ट्राचा दौरा करून समाजातील सर्वांचा अडीअडचणी समजून घेत आहे या सर्व अडचणी मी मुख्यमंत्र्यांपर्यंत घेऊन जाणार आहे आणि जर त्या अडचणी सोडवण्यात मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष केले तर वेळप्रसंगी एक लढा उभारून समाजातील प्रत्येकाला न्याय मिळवून देईल तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही असे रमेश गालफाडे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बहुजन रयत परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष कोमल ताई साळुंखे यांनी सांगितले की समाजातील महिलांनी शिक्षण घेऊन उद्योग व्यवसायांची माहिती माहिती घेत एकमेकांना साथ देऊन आपण आपला विकास साधला पाहिजे परिषदेच्या माध्यमातून जनजागृती करत समाजाचा विकास साधण्यासाठी मी नेहमी पुढाकार घेईल असे साळुंके यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी लहुजी सैनिक संघाचे संस्थापक रतन शेलार, जितेंद्र गालफाडे, राष्ट्रीय किसान बहुजन पक्षाचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात स्वप्नील गालफाडे, कृष्णा दणके, प्रेम गालफाडे, पोपट नेटके, रवींद्र वाकळे, गजानन दणके, कैलास शिंदे, नितीन गोपने, उत्तम सुकळीकर, बाबासाहेब जगधने, अनिल आवळे, सिताराम गायकवाड, रमेश शिरसागर परमेश्वर सगट, सतीश हिवाळे, राजेश ससाने, सूर्यकांत नावगिरे आदींची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close