औरंगाबाद

गंगापुरात रामगिरी महाराजांच्या हस्ते हॉस्पिटलचा शुभारंभ

गंगापूर/प्रतिनिधी

धन आणि पैसा कीतीही कमवा त्याचा काहीच ऊपयोग नाही अरोग्य ऊत्तम असेल तर हेच खरे धन असून आताच्या जगात आहार सर्व भेसळ यूक्त असल्याने आहारावर नियंत्रण असणे आवश्यक आहे. पुरातन काळापासून आलेले आयुर्वेद हे नाहीसे होऊन चालले आहे. आयुर्वेदमधे वनस्पती अशा मोठ्या प्रमाणात आहे. याचे संशोधन होणे गरजेचे असल्याचे प्रतीपादन श्री क्षेत्र सराला बेटाचे मठाधिपती ह.भ.प.महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांनी केले. गंगापूर शहरात डॉ.रविंद्र मनोहर ठवाळ , डॉ.सोनल वाघ (ठवाळ) यांचे लासुर रोडवर नवीन इमारतीत अत्याधुनिक सुविधेसह सुसज्ज माऊली हायटेक, मॅटर्निटी ,सर्जिकल, मेडीसीन, सोनोग्राफी , आदी सर्व एकाच छताखाली सुविधेसह या हॉस्पिटलचा २१ ऑगस्ट शनिवार रोजी श्री क्षेत्र सराला बेटाचे मठाधिपती ह.भ.प.महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते सुभारंभ करण्यात आला यावेळी मंहत रामगीरी महाराज बोलत होते. यावेळी वैजापूर, गंगापूर तालुक्याचे आमदार प्रा. रमेश बोरनारे, श्रीरामपूर चे आमदार लहुजी कानडे, खादी ग्राम ऊद्योगचे अध्यक्ष संतोष माने, नगरसेवक प्रदिप (भैय्या) पाटील, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती अवीनाश गंलाडे, अवीनाश पाटील, मारुती खैरे, भाग्येश गंगवाल, दिपक साळवे, रामेश्वर मुंदडा, डॉ आबासाहेब सिरसाट, शिवसेना तालुका प्रमुख सुभाष कानडे, लक्ष्मण भुसारे, वैजापूर पंचायत समितीचे सभापती मनाजी मिसाळ, गटविकास अधिकारी, विजय परदेशी, राहुल वानखेडे, किशोर राजपूत, ईश्वर राजपूत, दादापाटील चव्हाण, चांगदेव ठवाळ, डॉ.किरण गोरे, गंगापूर ऊपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ.गितेश चावडा, डॉ.महेश घुले, डॉ.सचिन जाधव, पुंडलीक पोळ, ह.भ.प.संदीप महाराज कडवे मधु महाराज, दत्तू महाराज खपके, रामभाऊ महाराज, चंद्रकांत महाराज, भाऊसाहेब बाराहाते, अंकुश सुंब पंचायत समिती सदस्य बद्रीनाथ चव्हाण , भानूदास पवार, राजेश वाघ,चांगदेव ठवाळ,मनोहर ठवाळ, बाबासाहेब ठवाळ, भगवान ठवाळ, भाऊसाहेब ठवाळ,दिलीप ठवाळ, शरद ठवाळ, यांच्या प्रमुख उपस्थितीत माऊली हायटेक, हॉस्पिटलचा शुभारंभ करण्यात आला सुत्रसंचालन शरद ठवाळ तर आभार डॉ रवींद्र ठवाळ यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close