औरंगाबाद

गावठी कट्टा व जिवंत काडतुसे खरेदीविक्री प्रकरणात तीन आरोपी अटकेत

गंगापूर पोलिसांची कारवाई

गंगापूर/प्रतिनिधी

गावठी कट्टा व जीवंत काडतुस बाळगून खरेदीविकी प्रकरणी तीन आरोपींना गंगापूर पोलिसांनी 20 आँगस्ट रोजी रात्री 9;00 वाजता अटक केली या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसाकडून मिळालेल्या माहितीनुसार फजल सरदार शेख (३२, रा.नविन कायगाव ता. गंगापूर) हा गावठी कट्टा सोबत बाळगत असल्याची माहिती गंगापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पो.नि.संजय लोहकरे यांना गुप्त खबऱ्याकडून मिळाल्यावरून पो.नि.लोहकरे, पोलीस उपनिरीक्षक दीपक औटे, गोपनीय शाखेचे योगेश हारणे, पोहेकॉ विजय भिल्ल, कैलास निंभोरकर, लक्ष्मण पुरी आदींनी तत्काळ कायगाव येथे धाव घेत २० आँगस्ट रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास सापळा लावत फजल याच्या सहारा चायनिज सेंटरवर छापा टाकला. या छाप्यात फजलच्या कमरेला गावठी बनावटीचा कट्टा व मॅगझीनमध्ये दोन जीवंत काडतुस असा एकूण ४५ हजारांचा मुद्देमाल आढळून आल्याने तो मुद्देमाल जप्त करत आरोपी फजल सरदार शेख यास पोलिसांनी खाक्या दाखवताच हा कट्टा आरोपी गणेश अशोक सोनवणे आणि सूरज सतिष पदार (दोघेही रा. गंगापूर) यांच्याकडून खरेदी केला असल्याची कबुली पोलिसांना दिली. यावरून पोलिसांनी या दोघांना एकमिनार चौकातील हॉटेलमधून ताब्यात घेतले आहे. सदर कामगिरी पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय लोहकरे, पोलीस उपनिरीक्षक दिपक औटे, बीट अंमलदार विजय भिल्ल,पोलीस नाईक योगेश हारणे, चालक रिजवान शेख, कैलास निंबोरकर, बलविरसींग बहुरे, लक्ष्मण पुरी, यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close