अमरावती

वादळामुळे घरावरचे छपर उडाले;संसार आला उघडयावर

अमरावती/प्रतिनिधी
कारंजा घा गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात ऊन सावल्यांचा खेळ सुरु आहे, गुरुवारी दुपारच्या सुमारास तालुक्यातील काकडा-परसोडी गावात आलेल्या वादळामुळे घरावरील , टीना फाटे उडून गेल्याने संसारच उघडयावर आला आहे. परसोडी येथील यशोदाबाई हजारे यांच्या घरावरील संपूर्ण टिना उडाल्या असल्यामुळे त्या बेघर झाल्या आहेत.त्यांच्या घराचे 70 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे, घटनास्थलाचा पंचनामा करून तलाठी यांनी याबाबतचा अहवाल सादर केला आहे, परसोडीचे सरपंच सतीश गाखरे,ग्रामसेवक रोशन धारपुरे यांनी गावकऱ्याच्या मदतीने तेथील जिल्हा परीषद शाळेमध्ये नुकसानग्रस्त हजारे कुटुंबियांची व्यवस्था मुख्याध्यापक यांच्या मदतीने तात्पुरती करुन दिली आहे.

गावातील काही नागरिकांच्या जनावरांच्या गोठ्याचे वादळाचा फटका बसल्याने नुकसान झाले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close