वर्धा

महादेवाचे  संहारक अस्त्र ‘ त्रिशूळ’ ची पुजा करताना वृद्धाची मान अडकून मृत्यू

वर्धा /प्रतिनिधी

महाशिवरात्रीच्या दिवशी  त्रिनेत्र शंकर महादेवाचे  संहारक अस्त्र ‘ त्रिशूळ’ ची पूजा अर्चा करताना मान अडकल्याने वर्ध्यात वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना महाशिवरात्रीच्या दिवशी जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपुर येथील भवानी वॉर्डात घडली.  विश्वनाथ टिकाराम टेकाम वय ६० असे मृतक शिवभक्तांचे नाव आहे. जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील अल्लिपूर येथे भवानी वार्डात ही घटना घडली. 60 वर्षीय विश्वनाथ टिकाराम टेकाम आणि पत्नी दोघे राहत होते. महाशिवरात्रीच्या दुपारी पत्नी घराच्या बाहेर गेली होती. यावेळी विश्वनाथ टेकाम हे घरात भगवान शंकराची उपासना करत होते. महाशिवरात्रीला महादेवाच्या त्रिशूलाच्या पूजेला विशेष धार्मिक महत्त्व आहे. बऱ्याच भागात मनोकामना पूर्ण झाल्यावर शिव मंदिरात त्रिशूल भेट देण्याचीही प्रथा आहे. विश्वनाथ यांनी दुपारी मद्यपान केलं. त्यांच्या घरातच पूजा करण्यासाठी त्रिशूळ रोवला होता, दुपारी कुणीही नसताना दारुच्या नशेत धुंद होऊन त्यांनी घरीच महाशिवरात्रीची पूजा करण्यास सुरुवात केली. नशेत त्रिशूळाच्या बाणात आपल्या मानेचा भाग घालून घेतला. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.  सदर घटना उघडकीस आल्यानंतर अल्लिपूर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनेची चौकशी करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णलयात पाठविला.  महाशिवरात्रीच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.   मृत्यू कसा झाला, ?हा प्रश्न उपस्थित होत आहे. अति मद्यपान केल्यामुळे  त्रिशूळा ला हार टाकताना तोल गेल्यामुळे, मृतकाची मान अडकल्यामुळे घटना होऊ शकते , असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. ठाणेदार   शैलेश शेळके यांच्या मार्गदर्शनात अल्लिपूर पोलीस पुढील तपास करत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close