औरंगाबाद

अखेर गंगापूर फाटा या ठिकाणी बस थांबण्याचे आदेश

गंगापूर/प्रतिनिधी

औरंगाबाद ,पुणे मुख्य महामार्गावरील गंगापूर फाट्यावर सर्व विभागाच्या एसटी महामंडळाच्या गाड्या थांबाव्यात यासाठी गंगापूर प्रवासी संघटना व स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान चे सचिव आबासाहेब शिरसाट यांच्यावतीने वारंवार पत्रव्यवहार करून बस थांबण्यासाठी प्रयत्न करण्यात आले परंतु सुरुवातीला औरंगाबाद विभागाचे विभागीय नियंत्रक यांनी या ठिकाणी बस थांबा नसल्याने बस थांबा थांबण्यासाठी अडचणी निर्माण होते असे कळवले होते यानंतर या प्रकरणाचा पाठपुरावा करून गंगापूर तालुक्याचे आमदार प्रशांत बंब यांनी यांच्या आमदार निधीतून या ठिकाणी दोन बसथांबे मंजूर केले नंतर ही या ठिकाणी बस थांबत नव्हत्या म्हणून शिवसेनेचे परिवहन महामंडळाचे मंत्री अनिल जी परब त्यांच्याकडे शिवसेनेच्या नगरसेविका पल्लवी शिरसाट व स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान चे सचिव आबासाहेब शिरसाट यांनी पत्र पाठवून गंगापूर फाट्यावर बस थांबण्यासाठी सर्व विभागाच्या विभागीय नियंत्रकांना आदेशित करून एसटी महामंडळाच्या तिकीट मशीन मध्ये गंगापूर फाट्याचा समावेश करण्यात यावा अशी मागणी केल्यानंतर मंत्रीमहोदयांनी संबंधित विभागाला कळवून या ठिकाणी थांबा मंजूर करून तिकीट मशीन मध्ये गंगापूर फाटा याचा समावेश करण्यात यावा असे आदेशित केले व एसटी महामंडळाच्या वतीने या ठिकाणी बस थांबा करून तिकीट मशीन मध्ये या फाट्याचा समाविष्ट करण्यात आला असे पत्र महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे  महाव्यवस्थापक यांनी  सौ पल्लवी आबासाहेब शिरसाट यांना  दिले यानंतर या ठिकाणी बस थांबा झाल्याने औरंगाबाद हुन पुण्याला जाणाऱ्या व पुण्याहून औरंगाबादला येणाऱ्या सर्व एसटी महामंडळाच्या बसेस याठिकाणी थांबल्याने परिसरातील प्रवाशांना प्रवासासाठी मार्ग सुखकर झाला आहे या निर्णयामुळे पुण्याहून येणाऱ्या प्रवाशांना गंगापूर फाटा परिसरातील सर्व प्रवाशांना यापूर्वी औरंगाबाद किंवा वाळूज या ठिकाणी तिकीट काढून जास्तीच्या तिकीटाचा भुर्दंड सहन करून त्याठिकाणी उतरावे लागत होते परंतु सदरील निर्णयामुळे या परिसरातील अनेक प्रवाशांना याचा लाभ होणार आहे व या परिसराचा या थांब यामुळे नक्कीच  विकास होणार आहे या निर्णयामुळे परिसरातील सर्व नागरिक व प्रवासी संघटनेच्या वतीने या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close