औरंगाबाद

पगारवाढीसाठी विप्रोच्या कामगारांचे चार दिवसापासून उपोषण सुरु

वाळूजमहानगर/प्रतिनिधी
वाळूज एमआयडीसी परिसरातील विप्रो इंटरप्राईजेस कंपनीतील कामगारांचे पगारवाढीचा करार १४ महिन्यापासून लांबणीवर पडला आहे. वेतनवाढीचा करार कंपनी व्यवस्थापनाने तत्काळ पूर्ण करून पगार वाढ करावी या मागणीसाठी कंपनीतील कामगारांनी (६) मार्च पासून आमरण उपोषण सुरु केले आहे. तीन दिवसापासून सुरु असलेल्या या उपोषणात कामगारांची प्रकृती खालावली आहे.

वाळूज एमआयडीसी परिसरातील विप्रो कंपनीतील कामगारांनी कामगार नेते आमदार प्रदीप जयस्वाल यांचे नेतृत्वाखाली रामकिसन शेळके पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र कामगार विकास संघटनेचे सभासदत्व स्वीकारले. गेल्या चौदा महिन्यापूर्वी कामगारांचा वेतनवाढीचा करार संपला आहे. त्यामुळे नवीन वेतनवाढीचा करार महाराष्ट्र कामगार विकास संघटनेच्या वतीने कंपनी व्यवस्थापनाला दिला आहे. मात्र कंपनी व्यवस्थापन या करारा संदर्भात कुठलीही बैठक घेत नाही. त्यामुळे कामगार आर्थिक अडचणीत सापडले आहे.
त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने संघटनेचे पदाधिकारी व कंपनीच्या युनिट पदाधिकाऱ्यांशी लवकरात लवकर सकारात्मक चर्चा करून कामगारांना पगार वाढ द्यावी. यासाठी संघटनेचे सचिव रामकिसन शेळके पाटील, उपाध्यक्ष गणेश घोरपडे व्यवस्थापनाशी सतत संपर्क साधत मागणी केली. मात्र व्यवस्थापन कामगारांच्या पगार वाढीकडे दुर्लक्ष करत असल्याने संघटनेच्या वतीने (६) मार्च पासून पगार वाढीसाठी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर कामगार आमरण उपोषणाला बसले आहे. या दरम्यान अनेक नेत्यांनी या आंदोलनाला भेट देत आपले समर्थन जाहीर केले आहे. मंगळवार (९) रोजी कामगारांचे प्रकृती बिघडली होती. चार दिवस उलटून सुद्धा याकडे कंपनी प्रशंसाने दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close