औरंगाबाद

पाच गावठी पिस्टलसह २८ जिवंत काडतुस विक्री करणाऱ्या दोन आरोपींना ठोकल्या बेड्या

वाळूज एमआयडीसी पोलिसांची कारवाई

वाळूजमहानगर/प्रतिनिधी

वाळूज परिसरात बेकायदेशीररित्या गावठी पिस्टल व जिवंत काडतूस विक्री करण्यासाठी आणलेल्या दोन आरोपीना वाळूज एमआयडीसी पोलिसांनी मोठ्या सितापीने ताब्यात घेतले, त्यांची झडती घेतली असता त्यांच्या जवळ पाच गावठी पिस्टल व जिवंत २८ काडतूस सापडले, व त्यापैकी चार पिस्टल काडतूस हि टाकलेले असल्याचे आढळून आले, यामुळे पोलिसांना मोठी कसरत करून आरोपींना ताब्यात घ्यावे लागले.  दि ०६ मार्च रोजी पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, दोन ईसम हे विनापरवाना, बेकायदेशिररित्या गावठी पिस्टल व जिवंत काडतुस विक्री करणेसाठी हॉटेल रॉयलसमोर, वैष्णवदेवी मंदिर रोड, MIDC वाळूज, औरंगाबाद या ठिकाणी मोटार सायकलवर येणार आहे.

त्यापैकी एका ईसमाजवळील पिस्टलच्या मॅगझीनमध्ये जिवंत काडतुस भरलेले आहेत व तो त्याचा उपयोग करू शकतो. सदरची मिळालेली बातमीवरून सपोनि गौतम वावळे व विशेष पथकातील अंमलदार यांना कार्यवाही करणेबाबत सुचना दिल्या तेव्हा खबरदारी व सुरक्षीततेसाठी गौतम वावळे यांनी स्वतःची सर्विस रिव्हॉल्वर सोबत घेवून पो.स्टे.चे विशेष पथकाती अधिकारी व अंमलदार आणी दोन पंच असे बातमीच्या ठिकाणी रॉयल हॉटेल समोर, वैष्णवदेवी मंदीर रोड, MIDC वाळूज येथे गेले तेव्हा बातमीदाराकडून बातमी मिळाली की, नमूद ईसम हे पिस्टल घेवून कामगार चौकात येणार आहेत. त्यामुळे छापा पथक वाहनात बसून कामगार चौकात गेलो त्यावेळी पुन्हा बातमी मिळाली की, पुर्वी ठरल्याप्रमाणे ते रॉयल हॉटेलवरच येणार आहेत त्यामुळे पुन्हा सर्वजण रॉयल हॉटेलजवळ येवून सापळा रचून थांबले. तेव्हा काही वेळाने बातमीच्या वर्णनाप्रमाणेचा दोन ईसम मोटार सायकलवर पंढरपूर रोडकडून रॉयल हॉटेलकडे येवून हॉटेल समोरील खुर्चीवर जावून बसले. बातमीतील ईमस हेच असल्याची खात्री झाल्याने गौतम वावळे साहेबांनी ईशारा करताच खुर्चीवर बसलेल्या ईसमांना योग्य खबरदारी घेवून १४.३५ वाजता ताब्यात घेतले. तेव्हा गौतम वावळे साहेबांनी सदर ईसमांना पोलीस ओळखपत्र दाखवून त्यास स्वतःचा, दोन्ही पंच व स्टाफचा परिचय देवून त्यास त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्याने ते सांगणेस प्रथम टाळाटाळ केली तेव्हा त्यास अधिक विश्वासात घेवून पुन्हा नाव व पत्ता विचारले असता त्याने त्यांचे नाव १) सचिन मुराब पवार, वय-२९ वर्ष, रा. रामगव्हान वस्ती (बुद्रुक) ता. अंबड, जि. जालना. २) सुंदर भाऊसाहेब काळे, वय-१९ वर्ष, रा. हिवरारोशनगाव, ता.जि. जालना असे सांगीतले तेव्हा पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता सचिन पवार याचे पोटाला समोरून पॅटच्या आतून खोसलेली एक गावठी पिस्टल व तीच्या मॅगझीनमध्ये २ जिवंत काडतुसे तसेच सुंदर काळे याचे जवळील बॅगमध्ये ४ गावठी पिस्टल व २६ जिवंत काडतुसे मिळूण आले. तेव्हा त्यांना त्यांच्या ताब्यात मिळूण आलेले सदर अग्निशस्त्र व काडतुस बाळगण्याचा परवाना आहे का असे विचारले असता त्यांनी परवाना नसल्याचे सांगीतले. सदर ईसमांकडे एकूण ५ पिस्टल १,२५,००० रू. किं.चे व २८ जिवंत काडतुस २८०० रू. किं.चे व एक मोटार सायकल क्र. MH-२१-BR-०३७३ अशी ८०,००० रू. किं.ची असा एकूण २,०७,८०० रू. किं.चा माल जप्त करण्यात आला आहे. त्याचा सविस्तर पंचनामा सपोनि गौतम वावळे यांनी केला असून पोलीस अंमलदार प्रकाश गायकवाड यांनी सरकार तर्फे फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरची कामगीरी ही मा. पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, मा. पोलीस उप आयुक्त निकेश खाटमोडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, विवेक सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, तसेच सपोनि गौतम वावळे, सफो. खय्युम पठाण, पोना प्रकाश गायकवाड, नवाब शेख, सुधिर सोनवणे, पोशि विनोद परदेशी, मनमोहनमुरली कोलीमी, अविनाश ढगे, बंडू गोरे, दिपक मतलबे यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close