औरंगाबाद

रोजगार हमी अंतर्गत वैयक्तिक सिंचन विहिरींना पंचायत समितीकडून मंजुरी  मिळणार-संदिपान भुमरे

 रोहयो मंत्री  संदिपान भुमरे यांच्या प्रयत्नांना यश

औरंगाबाद/प्रतिनिधी

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत स्थानिक पातळीवर मजुरांना अकुशल स्वरूपाचे काम उपलब्ध करून देण्यासोबतच स्थानिक पातळीवरील शेतकऱ्यांना  वैयक्तिक लाभाच्या सिंचनाच्या विहिरीची कामे मंजूर करण्याचे अधिकार आता  पूर्वी प्रमाणेच पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकारी यांना प्रदान करण्याचे आदेश नियोजन विभागाच्या(रोहयो) दि.4 मार्च 2021 च्या शासन निर्णयाद्वारे निर्गमित केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना  या योजनेचा लवकर ,विनाविलंब लाभ मिळण्यासाठी रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांनी केलेल्या पाठपुरवा व प्रयत्नांना यश आले आहे. तसेच  या  आदेशामुळे राज्यभरातील मजूरा सोबतच शेतकरी देखील आनंदित झालेले असून शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ तात्काळ मिळणार आहे. सध्या वैयक्तिक विहिरीचा लाभ देण्यासाठी लाभधारकांची निवड ग्रामसभेमार्फत केली जाते . त्यानंतर संबंधित लाभधारकाचा सविस्तर प्रस्ताव तयार करून गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्या कार्यालयात सादर करण्यात येतो .  त्यानंतर सदर प्रस्ताव ऑनलाइन पद्धतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनरेगा जिल्हा परिषद यांच्यामार्फत सादर करण्यात येतो. या पद्धतीने कार्यवाही करताना तांत्रिक बाबीं , पुरेशा मनुष्यबळाअभावी  तसेच सर्व अधिकाराचे केंद्रीकरण झाल्यामुळे कामे मंजूर होण्यास बराच  विलंब होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्या  तक्रारींची  भुमरे  यांनी तात्काळ  दखल घेत  व कार्यवाही करीत सदरील कामे मंजूर करण्यासाठी ग्रामसभेमार्फत सविस्तर प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर हे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद  यांच्याऐवजी संबंधित तालुक्याचे  गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना प्रदान करण्याबाबत रोजगार हमी योजना खात्यास आदेशित केले होते . या योजनेच्या गतिमान व प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने करण्यात आलेला हा अमुलाग्र बदल  असून हा निर्णय अतिशय धोरणात्मक व परीणामकारक राहणार असल्याचे सर्व स्तरातून चर्चा होत आहे.या निर्णयामुळे राज्यातील जवळपास 28, 500 ग्रामपंचायतीमधील शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार असून राज्यातील सिंचनाच्या क्षेत्रामध्ये देखील वाढ होणार आहे .

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close