जळगाव

किंनगाव येथे वाळूमाफियांची महसूल पथकाशी हुज्जत : पोलिसात गुन्हा दाखल

वाळूमाफियांची दबंगगिरी कधी थांबणार ?

फैजपुर/ राजु तडवी

किनगाव येथे वाळु माफीयाचे डंपर मंडळ अधिकारी जगताप यांनी अडविल्याने मोठा वाद निर्माण  झाला अशा वादाची ही तिसरी घटना आहे  पो  नि सुधीर पाटील यांच्यासह पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली . वाळू तस्करांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिनच दिवसापुर्वी किनगावात मंडळ अधिकारी सचिन जगताप आणी महसुल कर्मचाऱ्यांच्या पथकाव्दारे अवैध वाळुची वाहतुक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आली  काल ४ मार्चरोजी रात्री पुनश्च नाकेबंदीवर असलेल्या महसुल अधिकारी व कर्मचारी यांनी वाळुने भरलेला डंपर अडविण्याचा प्रयत्न केला असता, आधीच्या  वादग्रस्त कारवाईमुळे गोंधळ होवुन कर्मचाऱ्यावर जिवे ठार मारण्याचे प्रयत्न झाले होते. महसुल प्रशासनाच्या तक्रारीवरून पोलीसांनी तात्काळ कारवाई करीत महसुल पथकास जिवे ठार मारण्याच्या प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक केली महसुल आणी वाळु माफीयाचा संघर्ष वाढला असुन  ४ मार्च रोजी रात्री किनगावच्या चौफुली पाँईटवर सुमारे पाचशे लोकांच्या उपस्थितीत  महसुल प्रशासनाशी वाद झाला याच प्रसंगातुन जळगावच्या दिशेने पळुन जाण्याच्या गोंधळात या डंपर खाली रस्त्याने जाणाऱ्या काही महीला थोडक्यात बचावल्या. या संदर्भात यावलचे तहसीलदार महेश पवार , किनगावचे मंडळ अधिकारी सचिन जगताप यांच्यासह तलाठी व महसुल कर्मचारी यांनी  पोलीस स्टेशनमध्ये  तक्रार दिली डंपरचा क्लीनर अमोल सपकाळे यास चालक सोडुन पसार झाला , पोलीसांकडुन क्लीनर सपकाळे यास रात्रीच अटक करण्यात आली चालक वाहन घेवुन घटनास्थळावरून फरार झाला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close