बुलडाणा

लोणार शहरातील मेन रोडवरील तिन दुकानास आग लागुन लाखो रूपयाचे नुकसान

लोणार/संदीप मापारी पाटील

लोणार शहरातील मुख्य रस्त्यावरील तिन दुकानास आग लागुन लाखो रूपयाचे नुकसान झाल्याची घटना 2 मार्च 2021 च्या  सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान घडली असनु अदयापपर्यत आगीवर नियंत्रण मिळविता आले नाही यामध्ये कपडा दुकान, स्टेशनरी, व किराणा दुकानाचा समावेश आहे. लोणार ते लोणी रोडवर हिरडव चौकामध्ये शरद किराणा , जैन कलेक्शन, शुभमंगल कापड केंद्र या तिन दुकानास अचानक 2मार्च च्या सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान शरद किराणा यांच्या दुकानास प्रथम आग लागली आगीचे रोद्र रूप पाहाता सर्वत्र हाहाकार झाला पाहता पाहता आगीने मोठा भडका घेत शेजारी असलेल्या जैन कलेकशन व शुभमंगल कापड केंद्रावर ही आपला हल्ला चढविला आगीचे बातमी शहराभर पसरताच सर्वत्र नागरिकाची आग विझविण्यासाठी जिवाचे रान करित होते लोणार मेहकर चिखली. नगरपालीका अग्नीशामक दल  तसेच शहरातील खाजगी पाणी ट्रकर आग विझविण्यास व्यस्त होते मात्र आगीचे रौद्र रूप पाहता आग विझविण्यारे सुध्दा कमी पडले सदर आग तब्बल दोन तासापासुन सुरू असताना सुध्दा आग विझविण्यामध्ये वृत्त लिहेपर्यत आटोक्यात आली नव्हती या आगीमध्ये तब्बल तिन्ही दुकानाचे सर्व साहीत्य जळुन अंदाजे 60 ते 70 लाखाचे नुकसान झाले यावेळी नागरिकाची एकच गर्दी केली होती यामध्ये अग्नीशामक दलाचे शेख खालीक हा अग्नीशामक गाडीवरून पडल्याने गंभीर जखमी झाला आहे मात्र आगी मध्ये कोणत्याही प्रकारची जिंवीत हानी झाली नाही. हि आग विझविण्यासाठी तहसीलदार सैफन नदाफ . पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख . नगरपालिका मुख्य अधिकारी विठ्ठल केदारे . आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसह सतत चार तास अतक प्रयत्न करताना दिसले. या वेळी सर्व राजकीय. सामाजिक कार्यकर्ते सर्व धर्म च्या नागरिकांनी हि आग आटोक्यात आणण्यासाठी सहकार्य  केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close