अहमदनगर

पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात युवक काँग्रेसचे अभिनव आंदोलन

महागाई विरोधात बोलू नका ,पाहू नका ,ऐकू नका असे विडंबनात्मक टीकास्त्र

संगमनेर/अमोल भागवत

पेट्रोल व डिझेल ची झालेली भरमसाठ दरवाढ, घरगुती गॅसचे वाढलेले भाव या विरोधात महाराष्ट्राचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका युवक काँग्रेस व एनएसयूआयच्या वतीने महागाई विरोधात बोलू नका ,पाहू नका, ऐकू नका असे विडंबनात्मक फलक लावत पेट्रोल पंपावर अभिनव आंदोलन करण्यात आले. संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने विविध पेट्रोलपंपांवरती पंतप्रधान मोदी यांचे महागाईविरोधात बोलू नका, ऐकू नका व पाहू नका असे विडंबनात्मक फ्लेक्स लावण्यात आले आहेत. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत करण्यात आली. याप्रसंगी पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ आरगडे , उत्तर नगर जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, संगमनेर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष आनंद वर्पे, शहरअध्यक्ष निखील पापडेजा, अकोले तालुका युवक अध्यक्ष अमोल नायकवाडी ,विजय उदावंत, तुषार वनवे, हर्षल राहणे, अमित गुंजाळ , निखिल पवार, अक्षय दिघे, साहिल इनामदार, दत्ता वाकचौरे, ऋतिक राऊत , मनिष राक्षे, शुभम पेंडभाजे, अनिकेत आंब्रे, गौरव जाधव, मोहन पठाडे, प्रदीप नाईकवाडी ,सुमित पानसरे , बाळासाहेब कुहार्डे, नवनाथ कुरकुटे, बाळासाहेब कुरकुटे, सयाजी कुरकुटे, प्रमोद कुरकुटे, चेतन कजबे, बाजीराव शेरमळे, निखिल कुरकुटे आदी उपस्थित होते. यावेळी सुभाष सांगळे म्हणाले की , केंद्र सरकार सातत्याने पेट्रोल व डिझेलची दरवाढ करत आहे याचा भार सामान्य नागरिकांवर पडत आहे. मोदी सरकार हे जनतेला फसवून सत्तेवर आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असताना भारतात मात्र दररोज पेट्रोलचे भाव वाढत आहे. यात अत्यंत दुर्दैवी आहे. मोदी सरकारने ताबडतोब दरवाढ मागे घ्यावी अन्यथा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. आनंद वर्पे म्हणाले की, महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात व सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेस रायभर आंदोलन करणार आहे. मोदी सरकारने केलेली भाववाढ ही जनतेची लूट असल्याची टीकाही त्यांनी केली. निखील पापडेजा म्हणाले की, दररोज वाढणारी भाववाढ ही हास्यास्पद आहे. सर्वत्र जगात पेट्रोलचे भाव कमी होत आहे. मात्र भारतात भाववाढ होत आहे. पेट्रोलची शंभरी हा अभिनव मोदींचा उपक्रम असल्याचेही ते म्हणाले यावेळी नवनाथ आरगडे यांनी मोदींच्या विविध धोरणावर कडाडून टीका केली. यावेळी मोदी सरकार हाय हाय , युवक काँग्रेस जिंदाबाद च्या घोषणांनी परिसर दुमदुमला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close