मुंबई

मोदीभक्तीची पट्टी डोळ्यावर बांधल्याने भाजप नेत्यांना इंधनदरवाढ दिसत नाही- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

इंधन दरवाढीचा निषेध करत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसह मंत्री व आमदार सायकलवरून विधानभवनात

संगमनेर/अमोल भागवत

पेट्रोल डिझेलवर अवाजवी करवाढ करून दिवसाढवळ्या जनतेच्या कष्टाच्या कमाईवर दरोडा घालणारे केंद्रातील भाजपचे सरकार लुटारू आहे, काँग्रेस काळात 1 रुपया दरवाढ झाली तरी आंदोलन करणारे भाजपवाले आता पेट्रोलने शंभरी पार केली तरी डोळ्याावर पट्टी बांधली असल्याने गप्प आहेत, अशी घणाघाती टीका महाराष्ट्राचे महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात  यांनी केली आहे. पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसमध्ये प्रचंड दरवाढ करून केंद्रातील मोदी सरकारने जनतेचे जगणे मुश्कील केले आहे. या इंधन दरवाढीचा विरोध करण्यासाठी काँग्रेसचे सर्व मंत्री, आमदार आणि नेत्यांनी आज मंत्रालयासमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी काँग्रेसब मंत्री व आमदारांनी सायकलवरून प्रवास करत अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधान भवनात पोहोचले.  यावेळी माध्यमांशी बोलताना महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात म्हणाले, भाजपचे नेते 2014 पूर्वी इंधन दरवाढीवरून आरडाओरडा करत होते, मात्र आज तेच नेते नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली इंधन दरवाढ करून जनतेची लूट करत आहेत. दररोज आज इंधनाचे दर वाढत आहेत, जनतेच्या खिशातील पैसे अन्यायकारक पद्धतीने लुटले जात आहेत. मोदी सरकारला जनतेचा आवाज ऐकू येत नाही, त्यांच्या बहिरेपणावर इलाज करणे गरजेचे आहे. आम्ही आज सायकल रॅली काढून मोदी सरकारला इंधन दरवाढ मागे घ्या हे ठणकावून सांगितले आहे. जनतेच्या वेदना केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. केंद्र सरकारने याची दखल घ्यावी अन्यथा उद्रेक होईल असा इशारा त्यांनी दिला.

विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवर, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, रायमंत्री सतेज पाटील, रायमंत्री विश्वजित कदम, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गट नेते शरद रणपिसे, माजी मंत्री व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान, आ. कुणाल पाटील, आ. प्रणिती शिंदे, आ. अमित झनक, आ. धिरज देशमुख, आ. हिरामण खोसकर, आ. लहू कानडे, आ. डॉ. सुधीर तांबे, आ. प्रतिभा धानोरकर, आ. सुलभा खोडके, आ. मोहनराव हंबर्डे, आ. सुभाष धोटे, आ. राजू पारवे, आ. राजू आवळे, आ. शिरीष नाईक, आ. ऋतुराज पाटील, आ. जयंत आसगावकर, प्रदेश सरचिटणीस रामकिशन ओझा, प्रदेश प्रवत्ते डॉ. राजू वाघमारे, अतुल लोंढे, डॉ. संजय लाखे पाटील, सचिव राजाराम देशमुख यांच्यासह काँग्रेसचे आमदार सहभागी झाले होते.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close