औरंगाबाद

जोगेश्वरी ग्रामविकास अधिकार्याच्या सततच्या गैर हजेरी मुळे नागरिक त्रस्त

औरंगाबाद/प्रतिनिधी

जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायत हि मोठी ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीच्या हद्दीत मोठी लोक संख्या वास्तव्यास असून नागरिकांना विविध कागदपत्रांची गरज भासत असते, परंतु ग्रामसेवक भालेराव हे सतत ग्रामपंचायत कार्यालयातून गैर हजर असतात यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असून ग्रामसेवकांची आठवडाभर भर वाट बघावी लागते, काही नागरिकांनी असे हि सांगितले आहे कि ग्रामसेवकांना संपर्क केला आता त्यांचा फोन देखीळ बंद असतो , आणि कादाचीत फोन सुरु असलातरी देखील ते फोन घेणे टाळत आहे. काही वेळा ग्रामसेवक भालेराव यांना विचारणा केली असता मी मिटिंग मध्ये आहे, बाहेर गावी आहे किव्हा आजारी आहे असे करणे सांगतात. यामुळे नागरिकांची गैर सोय होत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन ग्रामसेवक यांना कायमस्वरूपी सुट्टीवर पाठवावे व कर्तव्यदक्ष ग्रामसेवक देऊन ग्रामपंचायत जोगेश्वरीचा कारभार सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांमधून होत.

जोगेश्वरी ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी सतत गैर हजार असल्याने नागरिकांची गैर सोय होत आहे, तरी प्रशासनाने ग्रामविकास अधिकारी भीमराव भालेराव यांना कार्य मुक्त करून कर्तव्य दक्ष ग्रामविकास अधिकाऱ्याची नियुक्ती करावी अन्यथा लोकशाही मार्गाने ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल.

नितीन पवार गावकरी

ग्रामसेवकांच्या सतत च्या गैर हजरी मुळे ग्रामपंचायत मध्ये नागरिकांचे काहीही काम असले तरी आप्पा आले नाही ते आल्यावर या असे कर्मचारी सांगत असतात, व ग्रामसेवक कधी येतील हे देखील माहित नाही असे उत्तर कर्मचारी देतात, यामुळे ग्रामपंचायत मध्ये वारंवार चकरा मारण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. तरी संबंधीत अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या सतत गैर हजर राहणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई करावी.

अमोल त्रिभुवन गावकरी

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close