औरंगाबाद

मनपा मध्ये समाविष्ट होण्यास ग्रामपंचायतींचा तीव्र विरोध

मनपाच्या तुलनेत ग्रामपंचायती विकास कामे करण्यास सक्षम- रामचंद कसुरे

औरंगाबाद /प्रतिनिधी

वाळूज ओद्योगिक शेत्रातील ग्रामपंचायती औरंगाबाद महापालिका मध्ये समाविष्ट होणार असल्याचे एका वृत्तपत्रात छापून आल्याने वाळूज ओद्योगीक परिसरातील ग्रामपंचयती मध्ये चांगलाच गोंधळ उडाला असल्याचे दिसून येत आहे. यामुळे वाळूज परिसरातील ग्रामपंचायतीचे सरपंच एकत्र येत या शासनाच्या निर्णयाचा विरोध करत आहे. या ग्रामपंचायतीच्या समावेश जर महापलिका मध्ये केला तर सद्याच्या स्थितीत महापालिकात होणारे विकास कामे कासव गतीने होतात, रोजच्यारोज नळाला पाणी येत नाही, गावाचा विकास होत नाही अशे अनेक प्रश्न यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच व लोकप्रतिनिधींनी शुक्रवारी घेण्यात आलेल्या बैठकीत मांडले.

व अशे हि सांगितले कि माहापालीकेच्या तुलनेत ग्रामपंचायत नागरिकांना सर्व सुविधा चांगल्या प्रकारे पुरवीत आहे, यामुळे ग्रामपंचायतीचा समावेश महापालिका मध्ये न करावा असे रामचंद कासुरे यांनी सांगितले. यावेळी महापालिका मध्ये  वाळूज, वडगाव कोल्हाटी-बजाजनगर, वळदगाव, पंढरपूर, तिसगाव, गोलवाडी, रांजणगाव शेणपूंजी, जोगेश्वरी आदी गावांचा समावेश करण्याच्या हल्चाळू सुरु झाल्या असून, वाळूज परिसरातील सरपंच व पदाधिकारी एकत्र येत या निर्णयाचा विरोध करत आहे. याच अनुसंघाने शुक्रवारी दि २६ रोजी हॉटेल मृगनयनी येथे पत्रकार परिषद आयोजित करून सर्व सरपंचानी आपली ग्रामपंचायत महापालिका मध्ये समाविष्ट होण्यापासून कशी वाचवावी चर्चा केली, व लवकरच ग्रामपंचायत बचाव कृती समिती स्थापन करून पुढील दिशा धर्विण्यात येईल असे वडगावचे सरपंच सचिन गारद यांनीं सांगितले. यावेळी सरपंच सईदानबी पठाण, रामचंद्र कसुरे, सचिन गरड, कपिंद्र पेरे, बाबासाहेब धोंडरे, शेख अख्तर, कैलास हिवाळे, महेबूब चौधरी, रोहित राऊत, नागेश कुठारे, सुनिल काळे, संजय जाधव, महेंद्र खोतकर, विष्णू पंत खेडकर, गणेश बिरंगळ, राजेश कसूरे, किशोर खांडरे, सतीश पवार, आदील चौधरी आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close