अहमदनगर

तहसीलदारांकडून वाळु वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी

खळबळ : बिना राॅयल्टी वाळु वाहतूकीला आळा

लोणार/संदीप मापारी पाटील

तळणी ता.मंठा जालना येथील पूर्णा नदीपात्रातील वाळु घाटातून वाळू उत्खनन सुरु होताच अवैध वाळु वाहतूक व बिना राॅयल्टीवर वाहतुकीला आळा घाण्यासाठी तहसीलदारांनी वाळु वाहनांची अचानक गुरुवारी दिवसभर तपासणी केली. तहसीलदार रस्त्यावर येताच सर्व वाहनधारकांनी राॅयल्टी घेऊन वाहतूक केली. पुर्णा नदीपात्रातील चार वाळुघाटातून वाळु उपसा सुरु आहे. यात अवैध वाळु वाहतूक व बिना राॅयल्टीवर वाळु वाहतूक सुरु असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तक्रारीची दखल घेत  मंठा तहसीलदार सुमन मोरे यांनी उस्वद रोड , देवठाणा रोड , लोणार रोड मंठा रोडवरील अनेक वाळु वाहतूकीची वाहनांची दिवसभर तपासणी केली. त्यातच परतूरचे उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी सर्व वाळुघाटाची पाहणी केली. दिवसभर उपविभागीय अधिकारी व तहसीलदार रस्त्यावर येताच सर्व वाहनधारकांनी राॅयल्टी घेऊन नावाप्रमाणे वाळु वाहतूक करताना दिसून आले.

तपासणीत राॅयल्टी आढळल्या – तहसीलदार मोरे

या बाबत मंठा तहसीलदार सुमन मोरे यांना विचारले असता, बीना राॅयल्टी व अवैध वाळु वाहतूक सुरु असल्याच्या तक्रारीनंतर अचानक तपासणी केली . यात वाहनधारकांकडे नियमानुसार राॅयल्टी आढळून आल्याचे तर एका 407 वर कारवाई करण्यात आली तहसीलदार मोरे म्हणाला .

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close