औरंगाबाद

वैजापूर येथे तहसीलदारांनी केली झालेल्या कामाची पाहणी

महालगाव/प्रतिनिधी

महालगांव ता. वैजापूर येथे सुंदर माझे गांव व कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले, तहसीलदार राहील गायकवाड, बीडीओ ज्ञानदेव मोकाटे, शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश गलांडे,  यांनी पहाणी करुन झालेल्या कामाविषयी समाधान व्यक्त केले. यावेळी  मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले, तहसीलदार राहील गायकवाड, बीडीओ ज्ञानदेव मोकाटे, शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश गलांडे,  प्रकल्प संचालक संगितादेवी पाटील, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संतोष कवडे, गटशिक्षण यांनी चौदामैल येथिल पाझर तलावातील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतुन मंजुर असलेल्या विहीरीची पहाणी, 2515 योजनेतुन जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत बसवलेल्या पेवरब्लॅगचे श्रीफळ फोडुन लोकार्पण केले, तसेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील प्रांगणात प्लॅस्टीक गोळा करुन मुक्ती अभियान राबविण्यात आले, तसेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्वालंबन योजनेतुन भाऊसाहेब आल्हाट विहीरीची व पीक पहाणी करुन समाधान व्यक्त केले. यावेळी  अधिकारी मनीष दिवेकर, विस्तार अधिकारी पंडीत, म्हस्के, शाखा अभियंता के. टी. हत्ते, अभियंता राहुल आल्हाट, सिंचन विभागाचे उप अभियंता डी. के. गवळी, पाणी पुरवठ्याचे उप अभियंता रमेश कोयलवार सरपंच पती भाऊसाहेब झिंजुर्डे, देविदास जाधव, बाजार समितीचे संचालक सुरेश आल्हाट, उपसरपंच कडु आल्हाट, ग्रामपपंचायत सदस्य कैलास शेळके, रजनीकांत नजन, प्रकाश आल्हाट,मंडळ अधिकारी एस. व्ही. अंभोरे, ग्रामविकास अधिकारी आर. आर. शिनगारे, तलाठी धनवेआप्पा, विरगांव पोलिस स्टेशनचे जगदिश पवार,  मुख्यध्यापक बाळासाहेब म्हस्के, राजु गलांडे, अदि ग्रामस्त हजर होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close