ब्रेकिंग

वीना नंबर नेट नसलेल्या  रेती वाहतूक करणाऱ्या वाहनावर करणार कारवाई-तहसीलदार सैफन नदाफ

लोणार/संदीप मापारी पाटील

मराठवाडा व विद्रर्भच्या सीमेवर असलेल्या पुर्णा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात रेती असल्याने या ठिकाणी शासनाने लिलाव करून रेती वाहतूक सुरू केली आहे. या मुळे जवळपास जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर वाहने दाखल होत असुन बहुतांश वाहने हे वीना नंबर दिसत आहेत. या नदीवर जाण्यासाठी आताच नवीन झालेला पंढरपूर, शेगाव  हा महामार्ग असल्याने वाहन चालक सुसाट भरधाव वेगात जाताना येताना रेती वाहतूक करताना दिसत असुन जर अपघात झाला तर कारवाई कोणत्या वाहनावर करायची हा प्रश्न निर्माण होतो. हे काम आर. टि .वो .R T .  O चे. आहे, पंरतु  आज तहसीलदार सैफन नदाफ आपल्या कर्मचाऱ्यांसह वाहन तपासणी मोहीम सुरू केली. या मध्ये बहुतांश वाहने वीना नंबर असल्याचे आढळून आले तसेच रेती वर झाकण्यासाठी नेट ताडपत्री हि अढळून आली नाही तहसीलदार यांनी पेंटर सोबत नेऊन नंबर टाकून घेतले व नेट हि आणावी लावले व सर्व वाहन चालक मालक यांना  वीना नंबर व रेती नेट झाकलेली नसेल तर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे ठणकावून सांगितले. या  मोहिमेत तहसीलदार सैफन नदाफ, पंजाबराव खोकले मंडळ अधिकारी, विजय पोफळे तलाठी, भगवान मुसळे महसुल सहाय्यक, रवी वाघ महसूल सहाय्यक, संतोष जाधव तलाठी, विलास तुपकर महसूल सहाय्यक, किशोर मादनकर हे कर्मचारी होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close