अमरावती

कोरोनाच्या सावटामुळे सालबर्डी येथील यात्रा रद्द

सालबर्डी यात्रा न भरविण्याबाबत बैतुल जिल्हाधिका-यांना पत्र

अमरावती/सचिन ढोके

अमरावती जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने प्रतिबंधक उपाययोजना होत आहेत. त्यामुळे अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर व मध्यप्रदेशच्या सीमेवर सालबर्डी यात्रा भरवू नये, असे पत्र जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बैतुल जिल्हाधिका-यांना पाठविले आहे. मध्यप्रदेशातील प्रभातपट्टनच्या जनपद पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांनी सालबर्डी यात्रेबाबत प्रसिद्धीपत्रक वितरीत केल्याचे निदर्शनास आले आहे. वास्तविक महाराष्ट्राच्या हद्दीत यात्रा न भरविण्याबाबत यापूर्वीच सूचित करण्यात आले आहे. यात्रेसाठी यात्रेकरूंची वर्दळ व वाहतूक महाराष्ट्रातूनच होणार असल्याने कोविड 19 साथीची लागण मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यात्रा न भरविण्याबाबत कार्यवाही करण्याचे जिल्हाधिका-यांनी पत्रात नमूद केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close