औरंगाबाद

जात पडताळणी कार्यालयात ऑनलाईन वेबिनारचे आयोजन

खुलताबाद / प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या निर्देशानुसार सामाजिक न्याय भवन येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने ऑनलाईन वेबिनार झुम अँपवर मार्गदर्शन पर सेमिनार घेण्यात आला. यावेळी समितीचे अध्यक्ष महेंद्र हारपाळकर, उपायुक्त तथा सदस्य संजय दाने, संशोधन अधिकारी दिपक खरात यांनी जात पडताळणी कोणत्या चार कारणासाठी होते. त्यासाठी कोणते कागदपत्रे पुरावे लागतात. जात पडताळणी सम्पूर्ण प्रक्रिया याविषयी सखोल मार्गदर्शन केले.या कार्यक्रमात बहुतांश नागरिकांनी आपल्या समस्या सांगितल्या. सामाजिक न्याय विभागाचे सचिव शाम तागडे व महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्या निदर्शनानुसार प्रकल्प अधिकारी योगेश सोनवणे व सर्व समतादूत टिम व समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात बहुतांश नागरिक व विद्यार्थी,पालकांनी सहभाग नोंदवला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close