औरंगाबाद

ऑनलाईन सातबारा बंद असल्याने शेतकऱ्यांची परेशानी

गंगापूर/प्रतीनीधी

गंगापूर तालुक्यासह जिल्ह्यात नव्हे तर राज्यभरात गत पंधरवाड्यापासून ऑनलाइन साईटमुळे सातबारा व खाते उतारा मिळणे बंद झाले असून राज्य सरकारचा संबंधित सर्व्हर बंद असल्याने बळीराजाचे तलाठ्या कडील देखील कामे मोठ्या प्रमाणात खोळबंले असुन शासनाची ही साईट शेतकऱ्याची डोकेदुखी बनली आहे सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. जिल्ह्यात नव्हे तर राज्यभरात गत पंधरवाड्यापासून ऑनलाइन सातबारा व खाते उतारा मिळणे बंद झाले असून राज्य सरकारचा संबंधित सर्व्हर बंद असल्याने तलाठ्याकडे शेतकऱ्यांच्या विविध कामाच्या संचीकाचे मोठमोठे गठ्ठे पडले आहे बळीराजा तलाठी कार्यालयाचे ऊंबरठे झीजवुन ही काम होत नसल्याने शेतकरी पुर्णपणे वैतागला आहे एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांचे कामे होत नसल्याने तलाठी व शेतकऱ्यांमधे वाद होतांनाचे चित्र दिसत आहे. सर्वसामान्य जनतेसह शेतकरी, खरेदीदारांसाठी आवश्यक असलेला सात-बारा उतारा व खाते उतारा ऑनलाइन मिळणे गेल्या पंधरा दिवसांपासून बंद झालेले आहे. शेतकरी व नागरिक सातबारा उतारा व खाते उतारा घेण्यासाठी ई-सेवा तसेच तहसील कार्यालयातील सेतू केंद्रांचे उबंरठे झिजवित असतांना संबंधित सर्व्हेर डाउन असल्याने संगणक प्रतिसाद देत नसल्याने सात-बारा व खाते उतारा मिळत नसल्याने शेतकऱ्यांची धावपळ वाढली आहे. कृषी विभागासह पंचायत समिती, विद्युत वितरण, न्यायालयात आदी ठीकाणी महसूल विभागाच्या सातबाऱ्यासह आदी कागदपत्रांची आवश्यकता असते तसेच विविध विभागात सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी विविध योजना सादर केल्या असून त्यांना मुदतीत अर्ज करण्याचे सुचविण्यात आलेले आहे. या योजनांसाठी जमिनीचा, शेतीचा सातबारा व खाते उतारा अनिवार्य असतो. ही अत्यावश्यक कागदपत्रे ऑनलाइन मिळू शकत नसल्याने अनेक शेतकरी शासकीय योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता बळावली आहे. अनेकांना शेती खरेदी करण्यासाठी देखील सात-बारा उतारा आवश्यक असतो. अशा खरेदीची कामे या तांत्रिक गोंधळामुळे ठप्प झाली आहेत.

सातबाऱ्याचे सर्व्हर बंद असलयाने  सातबारा उताऱ्यासह आदी कागदपत्रे मिळत नसल्याने शेतीपयोगी विविध  योजनांपासून शेतकऱ्यांना वंचित रहावे लागत आहे. शासनाने  आँनलाईन साईट तत्काळ सुरू करावे,

भाऊसाहेब शेळके शेतकरी गळनिंब धानोरा ता. गंगापूर,

गत पंधरवाड्यापासून ऑनलाइन साईटमुळे सातबारा व खाते उतारा मिळणे बंद झाले असून राज्य सरकारचा संबंधित सर्व्हर बंद असल्याने बळीराजाचे तलाठ्या कडील देखील कामे मोठ्या प्रमाणात खोळबंले असुन शासनाची ही साईट शेतकऱ्याची डोकेदुखी बनली आहे सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल होत आहे साईट त्वरित चालू करावी,

संजय तिखे पाटील, प्रगतशील शेतकरी शिंगी, तालुका गंगापूर,

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close