औरंगाबाद

सोनखेडा येथे सरपंचासह ग्रामस्थांचे शोलेस्टाईल आंदोलन

आरोग्य उपकेंद्राच्या निकृष्ट कामाच्या चौकशीची मागणी

औरंगाबाद/प्रतिनिधी

औरंगाबाद- खुलताबाद तालुक्यातील सोनखेडा येथे बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची जिल्हा प्रशासनामार्फत चौकशी व्हावी तसेच ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे यासह विविध मागण्यांसाठी सोनखेडा ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य तसेच ग्रामस्थांतर्फे सोमवार दिनांक 22 फेब्रुवारीपासून आरोग्य केंद्र समोर शोले स्टाईल आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य प्रा.डॉ. सुरेश सोनवणे तसेच सोनखेड्याच्या सरपंच ललिताताई सोनवणे यांनी एका पत्रकान्वये दिली. 2008 मध्ये बांधण्यात आलेल्या या आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळ न खेळता हे बांधकाम त्वरित पाडण्यात यावे व सोनखेडा येथे त्वरित नवीन उपकेंद्र मंजूर करून त्याचे कामकाज त्वरित सुरू करावे. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांची चौकशी करून त्यांना तुरुंगात डांबण्यात यावे. नवीन उपकेंद्रास जागेवरच प्रशासकीय मान्यता देण्यात यावी. सोनखेडा येथे प्रसूतीच्या वेळी महिलांना आवश्यक त्या आरोग्य सुविधा उपलब्ध होत नसल्याने तातडीने त्यांना औरंगाबादयेथे नेताना वाटेतच ज्या नवजात अर्भकांच्या मृत्यू झाला अशा संबंधित मातांना पाच लाख रुपये भरपाई देण्यात यावी आदी मागण्यांचाही निवेदनात समावेश आहे. उपोषणास बसणाऱ्यांमध्ये सोनखेडच्या ग्रामपंचायत सदस्या  लताबाई वाकळे, शेख शबाना रशीद, सौ.योगिता ठील्लारे, राजेंद्र कसारे, मनोज सोनवणे, नवनाथ ठील्लारे आदींचा समावेश आहे. मागण्या मान्य होईपर्यंत साखळी उपोषण सुरूच राहणार असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. सोनखेडा गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रा ची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे केव्हा ही इमारत कोसळेल हे सांगता येत नाही. हा तर रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे. याबाबत प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार करून, इशारा देऊनही त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने नाईलाजास्तव ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांना उपोषणासारखा मार्ग अवलंबावा लागतो हे दुर्दैवच म्हणावे लागेल. या आंदोलनानंतरही प्रशासनास जाग न आल्यास आंदोलन आणखी तीव्र करावे लागेल.- ललिताताई सोनवणे सरपंच,सोनखेडा ग्रामपंचायत

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close