बुलडाणा

लोणार पोलिसांची सहृदयता मानसिकदृष्ट्या खचलेल्या विवाहिती सह तिच्या मुलीला सुखरूप घरी पोहचवले

पोलीस उपनिरीक्षक भारत बर्डे  यांची कौतुकास्पद कामगिरी

लोणार/ संदीप मापारी पाटील

एक मानसिकदृष्ट्या खचलेल्या २५ वर्षीय विवाहित महिला व तिच्या २ वर्षीय मुलीला सुखरूप तिच्या घरी पोहचवून देत ऑपरेशन मुस्कान मोहीम फत्ते करत लोणार पोलिसानी सहृदयता दाखवत कौतुकस्पद कामगिरी केली. दि.२० फेब्रुवारी २०२१ रोजी रात्री 10 वाजे दरम्यान एक २५ वर्षीय महिला आपल्या २ वर्षीय चिमुरडीला घेत लोणी रस्त्यावरील भागवत चित्र मंदिर ते डोईफोडे वाईन शॉप दरम्यान वेगात वाहन धावत असतांना ती परिसरातील नागरिकांना दिसली मात्र सदर महिला रडन्याशिवाय कुठलीच माहिती देत नव्हती हि बाब परिसरातील तानाजी मापारी, भारत राठोड, निखील राठोड,सोम शिंदे यांनी पत्रकार राहुल सरदार यांना सांगितली पत्रकार राहुल सरदार यानी सदर महिला व तिच्या मुली बाबत पाहणी करत घटनेचे गांभीर्य ओळखत लोणार पो.स्टे.चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना दिली, असता देशमुख यांनी आपले सहकारी पोलीस उपनिरीक्षक भारत बर्डे, लेखनिक चंद्रशेखर मुरडकर , ना.पो.कॉ.जगदीश सानप, पो.कॉ.तेजराव भोकरे. म.पो.कॉ.सीमा उन्हाळे, चालक सुधाकर काळे यांना घटनास्थळी पाठवले या वेळी पोलीस उपनिरीक्षक भारत बर्डे यांनी सदर महिलेला पुढील चौकशीसाठी लोणार पो.स्टे.ला आणले सदर महिला मानसिक दृष्ट्या कमकुवत असून ती रडण्याशिवाय काहीच माहिती देत नव्हती यावेळी तिच्या जवळील बॅग ची पंचसमक्ष तपासणी केली असता केज जि.बीड येथील डॉक्टरची औषधीची चिट्ठी मिळून आली व त्या मध्ये त्या महिलेचा पती पंढरी बाजड हे नाव समजले या वेळी या अगोदर कर्तव्यावर असतांना पोलीस उपनिरीक्षक भारत बर्डे यांना संपूर्ण बीड जीळ्याचो माहिती असल्याने त्यांनी त्या महिलेबाबत सखोल चौकशी करत माहिती मिळवली,नंतर सदर महिलेला पाणी चहा बिस्कीट देत आस्थेवाईकपणे चौकशी केली असता तिने लोणार तालुक्यातील गुंजखेड येथील आपले मामा बंडू सुलताने यांचे घरी जाण्यासठी निघाल्याचे सांगितले त्यानंतर तत्काळ पोलीस उपनिरीक्षक भारत बर्डे यांनी तपासचक्रे वेगात फिरवत गुंजखेड येथील पोलीस पाटील,सरपंच व इतर नातेवाईकांना तिचा व्हात्सआप वरून फोटो पाठवत तिची ओळख पटवली त्यावेळी त्या महिलेचे नाव रुपाली पंढरी बाजड रा.नेतंसा ता.रिसोड येथील असून तिची  दोन वर्षीय मुलगी कु.गुड्डी पंढरी बाजड असे नाव असून तिचा नवरा दारू पिवून तिला मारहाण करत त्रास देत होता व त्यानेच तिला लोणारला आणून सोडले व ते तेथून पळून गेला त्या महिलेचे मानसिक संतुलन बिघडल्याची माहिती त्या महिलेच्या मामानी दिली यावेळी  तिला पोलीस वाहनाने त्या महिलेला गुंजखेड येथील तिच्या मामच्या स्वाधीन करण्यात आले असून पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून पोलीस उपनिरीक्षक भारत बर्डे यांचे समयसुचकतेमुळे ती महिला सुखरूप घरी पोहचली अन्यथा एखादी वाईट घटना घडण्यअगोदर पोलिसांची कार्यतत्परता कामी आल्याने सदर महिला व तिची मुलगी सुखरूप घरी पोहचली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close