औरंगाबाद

गंगापूर येथे शिवतीर्थावर सर्वधर्मीय धर्मगुरू व लोकनेतेच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचा लोकार्पण सोहळा

गंगापूर/महंमद तांबोळी

शिवजयंतीनिमित्त शहरातील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले.  सरला बेटाचे मठाधिपती प.पू. रामगिरी महाराज, अमृतानानंद बोधी, मौलाना मुक्तार फैजी, फादर विल्फ्रेड सालढणा, मौलाना युसूफ, आ. प्रशांत बंब, आ. अंबादास दानवे, माजी आ. कैलास पाटील, किरण पाटील डोणगावकर, संतोष जाधव, बांधकाम सभापती अविनाश गलांडे, नगराध्यक्षा वंदना पाटील, नगरसेवक प्रदीप पाटील, भाग्येश गंगवाल यांच्या उपस्थित महंत रामगीरी महाराज यांच्या हस्ते रिमोटच्या साहाय्याने हजारो शिवभक्ताच्या साक्षीने १९ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजता पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. नावीन्यपूर्ण योजनेतून १ कोटी २२ लाख तर नगरपालिकेच्या निधीतून २७ लाख रुपये खर्च केला जात आहे.या नयनरम्य सोहळ्याचे प्रास्ताविक नगरसेवक प्रदीप पाटील यांनी केले. दरम्यान सकाळपासूनच छत्रपती शिवाजी महाराज उद्यान मध्ये विविध मैदानी खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम झाले सध्यांकाळी हजारोंच्या संख्येने शिवभक्त शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरन साठी जमले होते यामध्ये महिलांचा सहभाग जास्त होता या सोहळ्यामध्ये प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

शिवतीर्थावर प्रवेश करणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताला मास्क देण्यात आले यावेळी उपनगराध्यक्ष मंगला अर्जुनसिंग राजपूत, मुख्याधिकारी संतोष आगळे, नगरसेवक विजय पानकडे, अविनाश पाटील, भाग्येश गंगवाल, आबासाहेब शिरसाठ, प्रकाश जैस्वाल, पल्लवी शिरसाठ, सोनम साळवे, नईम मन्सूरी, अशोक खाजेकर, उर्मिला खैरे, सुरेश नेमाडे, मुकुंद जोशी, सफियाबी कुरेशी, ज्ञानेश्वर साबणे, मोहसीन चाऊस, सोनाली पाटील, दत्तात्रय साबणे, सुमित मुंदडा, अतुल रासकर, अशोक पाटील, सचिन विधाटे, दीपक साळवे, कल्याण बाराहते, अनिल चव्हाण, अनिल पाटील, अलिम कुरेशी, चंद्रशेखर पाटील, रामेश्वर पाटील, राजेंद्र राठोड, शिवा पाहूणे, संदीप आळंजकर, महेश पाटील, किरण पाटील, राजेंद्र राठोड, देवेंद्र गवारे, मुन्ना पाटील, अमोल मलिक, संदीप सोनवणे, नयन सोनवणे, संजय मनगटे, विजय पाटील, मच्छिंद्र पठाडे अमोल साळवे, भारत पाटील, सतीश बारे, निवृत्ती अभंग, मनोज आहेर, अरुण लांडे, लक्ष्मण आळंजकर,बाळु तोडगिले,उदय ज-हाड, अमोल कळसकर यांची उपस्थिती होती. या सोहळ्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड तहसीलदार अविनाश शिंगटे, पोलीस निरीक्षक संजय लोहकरे, आदींनी कुठे काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नियोजन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close