औरंगाबाद

जिल्ह्यातील ६ वाळूपट्ट्यांपैकी ४ पट्यांचा लिलाव, चार वाळूपट्ट्यातून तीन कोटी ३१ लाख साठ हजार रु शासनाच्या तिजोरीत

पुढच्या महिन्यात उर्वरित दोन घाटाचे इ टेंडरिंग 

औरंगाबाद/प्रतिनिधी

मागील दोन वर्षांपासून जिल्हाभरात सुरु असलेली अवैध वाळू वाहतूक आणि त्याद्वारे बुडत असलेला शासनाचा कोट्यवधींचा महसूल पुन्हा सुरु करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून ठप्प पडलेली वाळू पट्ट्यांची लिलाव प्रक्रिया औरंगाबाद जिल्हा प्रशासनातर्फे नुकतीच करण्यात आली. २८ डिसेंबर ते २१ जानेवारी दरम्यान ई-ऑक्शनद्वारे लिलाव द्वारे जिल्ह्यातील २० पैकी ६ वाळूपट्ट्यांचा लिलाव करण्यात आला, यापैकी ४ लिलाव झाले असून उर्वरित दोन साठी पुढील महिन्यात पुन्हा ई टेंडरिंग करण्यात येणार आहे. या चार वाळू पट्ट्यातून तीन कोटी ३१ लाख साठ हजार सत्त्याण्णव रुपये इतका महसूल मिळाला आहे.

मागील दोन वर्षांपासून औरंगाबाद जिल्ह्यातील वाळू पट्याच्या लिलावाची प्रक्रिया विविध कारणाने रखडली होती. त्यामुळे जिल्हाभरात चोरटी वाहतूक स्थानिक प्रशासनाच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात जिल्हाभरात सुरु होती. त्याला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध प्रयत्न केले जात असून लिलावही काढण्यात आले होते. परंतु अवैध मार्गाने चोरटी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने या लिलावाला वाळू ठेकेदारांनी पाठ दाखवली. त्यामुळे आता पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनाकडून २० वाळूपट्ट्यांच्या लिलावासाठी मुंबईत प्रस्ताव पाठवण्यात आले होते.  १४ वाळूपट्यांना स्टेट एन्व्हायरोनमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट अॅथॉरिटीच्या बैठकीत मान्यता मिळालेली नाही. १४ वाळूपट्ट्यां पैकी विविध कारणाने ५ वाळू घाट जिल्हाप्रशासने रद्द केले आहे तर उर्वरित ९ वाळू घाट प्रस्ताव फेर सर्वेक्षणासाठी पाठवण्यात आले आहे तर जिल्हातील ६ वाळूपाट्याच्या लिलाव प्रक्रिया ८ डिसेंबर ते २१ जानेवारी दरम्यान ई-ऑक्शनद्वारे पूर्ण करण्यात आली आहे. या सहा वाळूपट्ट्यांची किंमत प्रशासनातर्फे दोन कोटी ८४ लाख ठेवण्यात आली होती परंतु ६ पैकी फक्त चारच वाळू पट्ट्याचा लिलाव झाला असला तरी महसूल मात्र तीन कोटी ३१ लाख साठ हजार सत्त्याण्णव रुपये इतका मिळाला आहे अशी माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी अतुल दोड यांनी दिली आहे.

 

तालुकानिहाय वाळू पट्टे,                  सरकारी किंमत,             सर्वोच्च बोली                   घेणाऱ्यांचे नाव

गंगापूर तालुक्यातील शेंदुरवादा,    १९ लाख २९५६४ रु           ६१ लाख ११०००              साक्षी सप्लायर

कन्नड तालुक्यातील देवळी,          ४६ लाख ३००८० रु           ४७ लाख रु                    मयूर मल्टिसर्व्हिसेस

वैजापूर तालुक्यातील झोलेगाव,     ७४ लाख २७७८४ रु          ८७ लाख ७७७७७ रु       एस ए जाधव

वैजापूर तालुक्यातील भालगाव,      ४० लाख ५१३२० रु         १ कोटी ३५ लाख ७१३२० रु   साक्षी सम्प्लायर्स

 

लिलाव न झालेले वाळूपट्टे आणि सरकारी किंमत

सिल्लोड तालुक्यातील भवन,         ४५ लाख ११३६० रु

वैजापूर तालुक्यातील लासूर गाव,   ५६ लाख ३९२०० रु

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close