जळगाव

किनगाव जवळ पपई घेऊन जाणारी आयसर पलटी १५ मजुरांचा जागीच मृत्यू

अपघाता प्रकरणी पंतप्रधानांकडून दाखल ; प्रत्येकिय कुटुंबियांना २ लाखाची मदत जाहीर

फैजपुर / राजु तडवी

तालुक्यातील किनगाव जवळ झालेल्या अपघातात १३ मजूरांसह २ बालकांचा अशा १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५ गंभीर जखमी झाले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास किनगावजवळ आयशर टेम्पो पलटून हा अपघात झाला. दरम्यान, या अपघाताची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली असून मृतकाच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख आणि जखमींना ५० हजारांची मदत जाहीर करण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून मृत कुटुंबियांचे सांत्वन केले आहे . अपघातग्रस्त झालेल्यांना पंतप्रधान कार्यालयाकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान मदत निधीतून दोन लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना 50 हजार रुपये मदत दिली जाणार आहे. या अपघातामध्ये शेख हुसेन शेख मुस्लीम मन्यार वय ३० रा फकीरवाडा,सरफराज कासम तडवी वय ३२ रा केऱ्हाला, नरेंद्र वामन वाघ वय 25 रा आभोडा,दिगंबर माधव सपकाळे वय 55 रा रावेर, दिलदार हुसेन तडवी वय 20 रा अभोडा संदीप युवराज भालेराव वय २५र विवरा, अशोक जगन वाघ वय 40 आभोडा, दुर्गाबाई संदीप भालेराव वय 20 रा अभोडा, गणेश रमेश मोरे वय 05 रा अभोडा, शारदा रमेश मोरे वय १५ रा अभोडा, सागर अशोक वाघ वय ०३ रा अभोडा, संगीता अशोक वाघ वय ३५ रा अभोडा, सुमनबाई शालिक इंगळे वय ४५ रा अभोडा, कमलबाई रमेश मोरे वय ४५ रा अभोडा, सबनुर हुसेन तडवी वय 53 रा अभोडा मयात झाले आहेत. या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाकडून ट्वीट करण्यात आले आहे. शोकाकुल कुटुंबाच्या दु:खात मी सहभागी असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. यावल तालुक्यातील किंनगाव येथे हृदय हेलावून टाकणारा ट्रकचा अपघात घडला आहे. शोकाकुल कुटुंबांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो. असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. दरम्यान किनगाव टेम्पो अपघातातील मृत मजुरांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत तर जखमींच्या उपचाराचाही खर्च करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close