औरंगाबाद

सक्तीची वीजबिल वसुली रद्द करा अन्यथा ,बैलगाडी  मोर्चा काढण्यात येईल- आ बंब

गंगापूर/प्रतिनिधी

शेतकऱ्यांना अखंडित विजपूरवठा सुरू ठेवुन शेतकऱ्यांचे पिके वाचवण्यात यावे,अन्यथा 15 तारखेला धडक बैलगाडी मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा आमदार प्रशांत बंब यांनी औरंगाबाद येथील मुख्य अभीयंता यांना निवेदनात देण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महावितरण कंपनी जाणूनबुजून वेठीस धरत असून सक्तीची वीजबिल देत असून विहिरीत पाणी असूनही विजेची सोय नसल्याने व विजमंडळाच्या आडमुठे धोरणामुळे शेतकरी पुरता वैतागला असून  गंगापूर/खुलताबाद मतदार संघातील शेतकऱ्यांना गहू,कांदे,हरभरा,व इतर रब्बी व भाजीपाला आदी पिकांना पाणी भरण्यासाठी वीज तात्काळ उपलब्ध करून द्या गंगापूर/खुलताबाद तालुक्यात यावर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केले असून त्यात गहू,कांदे,हरभरा, लसूण,भाजीपाला पिके,टरबूज,खरबूज या पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे मात्र वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांची पिके जोमात असताना त्यांना अवाच्या सव्वा वीजबिल देऊन सक्तीची वीजबिल वसुली करत असल्याचे समजते व त्यातच विहिरीत मुबलक पाणी उपलब्ध असतानाही केवळ विजेच्या लांपांडवामुळे पिके करपून चालली असून शेतकरी पुरता होरपळत आहे त्यामुळे मतदारसंघातील शेतकरी आर्थिक अडचणीत येऊ नये म्हणून जुलमी पद्धतीने विजवसुली करत वीज पुरवठा खंडित करू नये शेतकऱ्याना विहिरीत पाणी असून वीज नसल्याने कृत्रिम दुष्काळाच्या खाईत महावितरण कंपनीने ढकलू नये तसेच  गंगापूर/खुलताबाद मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या विजेसंबंधी विविध समस्या,ट्रान्सफार्मरच्या समस्या, यांचे निराकरण विजमंडळाच्या अधिकाऱ्यांनी येत्या आठवड्यात सोडवाव्यात नाहीतर येत्या पंधरा फेब्रुवारीला सोमवारी शेकडो शेतकऱ्यांसह धडक बैलगाडी मोर्चा औरंगाबाद येथील विद्यूत वितरण मुख्य कार्यालयावर काढणार असल्याचा इशारा आमदार प्रशांत बंब यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

.आमदार प्रशांत बंब “देव लागला द्यायला अन विजवीतरण कंपनी लागली हिसकायला”…. माझ्या गंगापूर/खुलताबाद मतदारसंघातील शेतकऱ्यांनी माझ्या कार्यालयास कळवले व मलाही तोंडी किंवा फोनद्वारे कळवले आहे की विहिरीत मुबलक पाणी असूनही महावितरण कंपनी सक्तीची वीजबिल पाठवत असून वीजपुरवठा तोडण्याच्या तयारीत असून सध्या फक्त दोन ते तीन तास वीज पुरवठा करत असून तोही कमी दाबाने करत आहे त्यामुळे ट्रान्सफार्मर व शेतकऱ्यांच्या मोटारी जळत असून आर्थिक भुर्दंड पडत आहे त्यामुळे येत्या आठवड्यात विजवीतरण कंपनीने याकडे लक्ष न दिल्यास धडक बैलगाडी मोर्चा काढण्यात येणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close