अहमदनगर

लोणार सरोवर विकासासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ॲक्शन मोडवर,लोणार सरोवरासाठी १०७ कोटीची निधी मंजुर

लोणार/संदीप मापारी पाटील

लोणार सरोवर विकासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लोणार येथे एम टी डी सी मध्ये आयोजीत बैठकीत 107 कोटी रूपयाचा निधी मंजुर केंला असुन सदर निधी 1 वर्षासाठी  उपलब्ध करून दिला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पदपथ साठी 10 कोटी, वनविभाग जमीन भुंसापादन साठी 15 कोटी , वेडीबाभुळ उच्चाटनासाठी 3.63 कोटी, शहरातील भुमिगत गटारासाठी 37 कोटी, एम टी डी सी च्या विकास कामासाठी 35 कोटी , पुरातत्व विभागासाठी 7 कोटी असे एकुण 107 कोटी निधी पुढील वर्षासाठी उपलब्ध करून दिलेला असुन लोणार सरोवरास निधी ची कमतरता भासु देणार नाही असे प्रतिप्रादन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले आहे. खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ. संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नला यश,  शिवसेना जिल्हा प्रमुख बळीराम मापारी यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली यावेळी शहर प्रमुख पांडुरंग सरकटे गजेंद्र मापारी व सर्व पत्रकार हजर होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close