औरंगाबाद

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने १९ फेब्रुवारी रोजी बसविण्यात येणाऱ्या पुतळ्याची भव्य मिरवणूक

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामुळे शहराच्या लौकिकात भर

गंगापूर/प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने १९ फेब्रुवारी रोजी बसविण्यात येणाऱ्या पुतळ्याची काढली मिरवणूक गंगापूर नगरपरिषद चे नगराध्यक्षा व सर्व नगरसेवक यांच्या संकल्पनेतून शहरातील एक ऐतिहासिक निर्णयाची पूर्तता होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची मिरवणूक शनिवारी लासुरनाका ,जिजामाता चौक, मारुती चौक,तीन कोनी, राजीव गांधी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज उद्यान अशी काढण्यात आली. या मिरवणुकीत शहरातील महिलांनी रस्त्यावर शेणाचा सडा, रांगोळ्या,यावेळी नगराध्यक्षा वंदना प्रदीप पाटील, उपनागराध्यक्षा मंगलताई अर्जुनसिंग राजपूत,पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे,नगरसेवक अविनाश पाटील, दीपक साळवे, नईम मंसुरी, मोहसीन चाऊस, नगरसेवक प्रदीप पाटील, मुकुंद जोशी, विजय पानकडे ,भाग्येश गंगवाल , लक्ष्मनसिंग राजपूत, मारुती खैरे ,अर्जुनसिंग राजपूत, कैलास साबणे,ऍड संतोष साबणे,सर्व धर्मीय ,मुस्लिम बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय ,जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत कार्यक्रमात उत्साह आणला यावेळी सर्व नगरसेवक व नागरिक,व्यापारी, वकील संघ,पत्रकार बांधव, महिला ,नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. गंगापूर नगरपरिषद अस्तित्वात आल्यापासून शहरात विविध विकासकामे होत आहेत.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सुशोभीकरण करणे ,डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ,जिजामाता चौक ,डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान व या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात महाराजांचा भव्य पुतळा उभा करावा, असा संकल्प नगरसेवक प्रदीप पाटील यांनी केला होता. याची पूर्तता होत असून खुलताबाद शिल्पकार नरेंद्र सिंग साळुंके यांनी हा अश्वारूढ पुतळा बनवला आहे.  लासुर नाका ते शिवाजी महाराज उद्यानपर्यंत वाजतगाजत मिरवणूक काढून हा पुतळा बांधकाम करण्यात आलेल्या चौथऱ्यावर बसवण्यात आला. या पुतळ्याचे लोकार्पण एका मोठ्या प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या हस्ते लवकरच केले जाणार असल्याचे नगरसेवक प्रदीप पाटील यांनी सांगितले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close