औरंगाबाद

ग्रीन व्हॅली पार्क नामफलकाचे भव्य उदघाटन

औरंगाबाद/प्रतिनिधी

ग्रीन व्हॅली पार्क विकास कृती समितीच्या वतीने तिसगाव गट ३९ पडेगाव परिसरातील ग्रीन व्हॅली पार्क नामफलकाचे भव्य उदघाटन २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी जेष्ठ समाजसेवक, विचारवंत अब्दुल्ला खान महेबुब खान मार्कोनी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक अब्दुल्ला खान मार्कोनी यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणून रवींद्र दाहाट , डॉ. हरिशचंद्र रामटेके, विनायक ढवळे, अशोक सोलंकर, सोमनाथ पांढरे, रफत शेख, आशिफ भाई, कईम खान यांची उपस्थिती होती. अब्दुल्ला खान मार्कोनी यांनी त्यांच्या अध्यक्षिय भाषणामध्ये सांगितले की, या ग्रीन व्हॅली कॉलनी परिसरामध्ये माझे जास्त प्रेम असून येथील रहिवाशी यांच्या साठी कंम्यूनिटी हॉल , तसेच वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन आणि इतर भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी निश्चितच माझे प्रयत्न राहतील अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ. हरिशचंद्र रामटेके यांनी केले तर आभार प्रदर्शन रविंद्र दाहाट यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैभव धनगर, साहेबराव शिंदे, अनिल शर्मा, गणेश चव्हाण, डॉ. अमरदिप रामटेके, अंकुश पाल, शेख निझाम, हारून भाई, दिलीप आंबरे, वैशाली दाहाट , रिना सोलनकर, सुकेशिनी रामटेके, कांचन पांढरे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रम मोठ्या उत्साहात व उत्साह पूर्वक वातावरणात साजरा करण्यात आला.

 

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close