औरंगाबाद

लोकनेते साहेबराव पाटील डोणगावकर विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

भिवधानोरा / प्रतिनिधी

नवीन कायगाव येथील लोकनेते साहेबराव पाटील डोणगावकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 72 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला व सर्व नियमांचे पालन करत यावेळी  प्रशालेचे मुख्याध्यापक शेख आयुब सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी ग्रामपंचायत प्रशासक, सकदेव साहेब, ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्य, सोसायटी चेअरमन व सर्व सदस्य, प्राथमिक आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका , आजी माजी सरपंच, माजी विद्यार्थी, तलाठी , पोलीस पाटील ,  सर्व विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्राध्यापक वर्ग व उपस्थित होते . या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक श्री शेख आयुब, संजय दाणे, राजेंद्र तारू , संजय राठोड, मोरे कडूबाळ,महाजन शिवाजी, पुंड रावसाहेब, शेळके रामेश्वर,खंडागळे संजय ,  सोनवणे कल्पना , सुरसने रामनाथ, चामे प्रकाश, शेळके कैलास, नंदा मते, ज्ञानेश्वर काळे,बाळासाहेब इष्टके,रामनाथ करपे, इत्यादी शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close