अहमदनगर

वडगांव पान येथील डी.के.मोरे विद्यालयात प्रजासत्ताक दिन आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरा

संगमनेर/अमोल भागवत

तालुक्यातील सहयाद्री  संस्थेचे  डी के मोरे जनता माध्यमिक व व उच्च माध्यमिक विद्यालय वडगाव यथे 72 वा प्रजासत्ताक दिन आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरा करण्यात आला . संगमनेर ग्रामीण रुग्णालयाचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर संदीप कचेरिया हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्राचार्य भाऊसाहेब शिंदे यांच्या  हस्ते ध्वजारोहण  करण्यात आले . प्रजासत्ताक  दिनाचे औचित्य साधून  विद्यालयातील विद्यार्थ्यांची रचना   SALUTE TO COVID WARRIORS या मध्ये मेडिकल स्टाफ,पोलिस डिपार्टमेन्ट,स्वछत कर्मचारी,बळीराजायांच्या प्रतीसद्भभावना व्यक्त करण्यासाठी सोशल डिस्टन्स ठेवून विद्यार्थी बैठक करण्यात आली होती. यामागचा एक सामाजिक संदेश म्हणजे. संपूर्ण जगावर कोविंड या रोगामुळे एक मोठं संकट आलं होतं या संकटाच्या काळात वरील योद्ध्यांनी खूप मोलाचे सहकार्य केले त्यांच्याप्रती  ऋण व्यक्त करण्यासाठी ही बैठक करण्यात आली होती . क्रीडा शिक्षक बाळासाहेब कांडेकर व कला शिक्षक सत्यानंद कसाब यांच्या संकल्पनेतून ही रचना साकारण्यात आली त्यांना प्रा.भीमराज काकड , भारत सोनवणे व सर्व  शिक्षक, शिक्षिकेत्तर कर्मचारी  आरुण डोखे , कचेश्वर, पवार ,रविंद्र काशिद,प्रकाश नेहे,गोरक्षनाथ कांबळे,नाना कांबळे  यांनी मदत केली. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले . प्राचार्य बी के शिंदे यांनी प्राचार्य संदेश  देताना म्हटले आपल्या जगाला  कोरोना या महाभयंकर रोगाने पछाडले होते यावेळी संपूर्ण जगाला मेडिकल स्टाफ पोलीस डिपार्टमेंट, स्वच्छता कर्मचारी, शेतकरी यांनी खूप मोलाचे सहकार्य करून एक आदर्श निर्माण केला आपण सर्वांनी आपली स्वत:ची काळजी घेऊन कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे स्वच्छतेचे सर्व नियम पाळले पाहिजे .वैभव थोरात व अविष्कार थोरात यांनी सुंदर रांगोळी काढून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी गावातील डॉक्टर डी..के शिंदे डॉ. दादासाहेब थोरात, डॉ.संजय  आचार्य डॉ जंबुकर डॉ शिँगोटे डॉ गायकवाड डॉ शिंगाडे व आशा सेविका श्रीमती गायकवाड ,स्वच्छता कर्मचारी बाळासाहेब गोफणे यांचा प्रातिनिधिक स्वरूपात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला . यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ व पालक विद्यालयातील उपमुख्याध्यापाक भाऊसाहेब वामन ज्यू कॉलेज इनचार्ज प्रा बाबा गायकवाड व सर्व शिक्षक , प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन पोपट दये यांनी केले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close