औरंगाबाद

जि.प.प्रा.शा.नविन बाजाठाण शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

महालगाव/प्रतिनिधी

वैजापूर तालुक्यातील जि.प.प्रा.शा.नविन बाजाठाण कें.गाढेपिंपळगाव शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.शा.व्स.समीतीचे अध्यक्ष मा.प्रकाश मिसाळ,उपाध्यक्ष मा.दादासाहेब कडू मा.सिताराम पा.भराडे, मा.संताराम मोरे यांच्या शुभहस्ते ध्वज फडकविण्यात आला. प्रसंगी उपस्थीत मान्यवरांचे शब्दसुमनाने स्वागत करुन उपस्थीत विद्यार्थी व पालक यांनी संविधा न उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक मच्छिंद्र भराडे यांनी आजच्या या शुभदिनाचे महत्व व कोरोना मुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक परिणाम व भविष्यातील त्यावर उपाय. जेणेकरुन विद्यार्थी अध्ययन प्रक्रीयेत टिकून रहावा यावर पुढील काही बाबी आम्ही शिक्षक म्हणून निश्चित ठरवून विद्यार्थी आभ्यासात पुर्वपदावर आणण्यास कटीबद्ध राहू असा शब्द पालकांना दिला. शासन देईल त्या निर्देशानूसार लवकरच शाळा सुरु होईल तेव्हा पालकांनी आपल्या पाल्यास शाळेत पाठवावे…याबाबत पुढील सुचना आम्ही कळवू. असे मार्गदर्शनात सांगितले..काही पालकांनीही या प्रजासत्ताक दिनास शुभेच्छा दिल्या. प्रसंगी आनेक पालक व विद्यार्थी सामाजिक अंतराने व मास्कचा वापर करुन हजर राहीली त्याबद्दल शाळेचे सहशिक्षक नजीर शेख यांनी उपस्थीत पालक, विद्यार्थी व महिला भगीणींचे आभार मानले.शेवटी शा.व्य.समीतीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी उपस्थीत विद्यार्थ्यांना प्रत्येकी पारले बिस्किट पुडे वाटप करुन या सुंदरशा आनंदमय ससोहळ्याचा समारोप झाला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close