औरंगाबाद

गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात ५७ पैकी दिली ३४ जणांना कोविड प्रतिबंधक लस

पहिल्याच दिवशी उत्तम प्रतिसाद

गंगापूर /प्रतिनिधी

गंगापूर शहरातील येथील उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी (दि.२५) कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या टप्प्यात रुग्णालय केंद्रात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. दिवसभरात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांना लस देण्यात आली. गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी (दि.२५) कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या टप्प्यात रुग्णालयात ४२आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.लसीकरण करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात सर्व आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती उपजिल्हा रुग्णालयात केंद्राला १७०आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. सोमवारी दिवसभरात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांना लस देण्यात आली. यात ५७ पैकी आज पुरुष २८ तर  महिला ६ आरोग्य अशा ३४ आरोग्य कर्मचारी अधिकारी यांना लस देण्यात आली. लस दिल्यानंतर कोणत्याही वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना त्रास झाला नाही. याप्रसंगी उद्घाटन करताना नगरसेवक प्रदीप पाटील, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ गजानन टारपे, नोडल अधिकारी डॉ सुदाम लगास ,डॉ वाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ विवेक कांबळे,पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे , रुग्ण कल्याण समिती सदस्य अतुल रासकर ,पंचायत समिती सदस्य सुमित मुंदडा, प्रशांत मुळे,डॉ साजिद शेख ,डॉ राठोड, डॉ नुमान,डॉ हर्षल धाबे , जामगाव ग्रामपंचायत चे नवनिर्वाचित सदस्य विनोद काळे ,राजेंद्र राठोड, बोडखे,शरद जाधव ,मंगेश गायकवाड, आरोग्य सेविका बी ए शेख, सहशिक्षक पाठक ,पोलीस गणेश काथार,अंगणवाडी सेविका राजमाला मुळे, मंदाकिनी लुंगाडे, कैलास साबणे , अमोल साळवे , रामेश्वर पाटील, आदी वैद्यकीय पथक उपस्थित होते.उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ गजानन टारपे यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close