नाशिक

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काँग्रेसची अहमदनगर ते नाशिक रॅली

संगमनेर/अमोल भागवत

केंद्र सरकारने कोणतीही पुर्वकल्पना न देता व शेतकर्‍यांशी विना चर्चा करता संमत केलेल्या नवीन कृषी विधेयकाविरोधात दिल्लीत अनेक दिवसांपासून शेतकर्‍यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. नव्याने तयार केलेला शेतकरी विरोधी कृषी कायदा रद्द करावा अशी या शेतकर्‍यांची मागणी असून केंद्र सरकार मात्र त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. या आंदोलक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ आता काँग्रेस पक्ष अहमदनगर ते नाशिक अशी रॅली काढणार असल्याची माहिती काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष सुरेश झावरे यांनी दिली. दिनांक 8 जानेवारी 2021 ते 9 जानेवारी 2021 या काळात ही रॅली होणार असून शुक्रवार दिनांक 8 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता अहमदनगर येथे या रॅलीचा शुभारंभ नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते होणार आहे. या रॅलीचे प्रस्थान सकाळी 11.00 होणार आहे. त्यानंतर दुपारी 1.00  वाजता राहुरी येथे आगमन, दुपारी 3.00 वाजता कोल्हार येथे या रॅलीचे आगमन होणार असून दुपारी 4.30 वा. लोणी येथे ही रॅली येणार आहे. त्यानंतर दुपारी 5.15 वा. निमगाव जाळी येथे व संध्याकाळी 6.30 वाजता संगमनेर येथे या रॅलीचे आगमन होणार असून मुक्काम असणार आहे. तसेच शनिवार दिनांक 9 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10.00 वाजता संगमनेर येथून नाशिक कडे ही रॅली प्रस्थान करणार आहे. रस्त्यात दुपारी 12.00 वा. सिन्नर येथे आगमन आणि दुपारी 4.00 वा. नाशिक येथे महाराष्ट्र रायाचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, विलासराव औताडे, प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, आ.लहू कानडे, बाळासाहेब साळुंखे, डॉ.तुषार शेवाळे आदि मान्यवरांच्या उपस्थित या रॅलीचा समारोप होणार आह. या वेळी प्रत्येक ठिकाणी फ्रंटल अध्यक्ष व कार्यकर्ते या शेतकती बवाच रॅलीचे स्वागत करणार असून रॅलीत 1 टॅक्टर, 2 चार चाकी वाहन व 50 ते 60 मोटरसायकल सहभागी होणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close