ब्रेकिंग

भव्य नेत्रतपासणी, चष्मा वाटप, व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, 300 च्या वर रुग्णांची तपासणी

कोरोना योद्धा आणि कर्तुत्ववान व्यक्तींचा करण्यात सत्कार

हिवरखेड/संजय भटकर

हिवरखेड येथे दिनांक 13 डिसेंबर रविवार रोजी सकाळी भव्य नेत्रतपासणी चष्मा वाटप व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले. यावेळी कोरोना योद्धे आणि कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार सुद्धा करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ अकोला नॉर्थ आणि स्व. आनंदीलाल चिरानिया चॅरीटेबल ट्रस्ट अकोला मार्फत हिवरखेड येथील चंडिका चौक परिसरातील विलास साउंड येथे भव्य नेत्रतपासणी चष्मा वाटप व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर दिनांक 13 डिसेंबर रविवार रोजी आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते दिनेश हनुमानदास बजाज, आणि सुजात चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुनील मोतीरामजी इंगळे यांनी केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोविंदराव भानुदासजी इंगळे, उद्घाटक म्हणून हिवरखेडचे ठाणेदार धिरज चव्हाण आणि प्रमुख अतिथी म्हणून संतोष महादेवरायजी बजाज यांची उपस्थिती होती. शिबिरामध्ये सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ. जुगल चिरानिया आणि डॉ. सुरेश तारे आणि त्यांच्या तज्ञ सहकाऱ्यांच्या हस्ते नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. यावेळी गरजूंना अत्यंत अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले. तसेच ज्या रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया ची गरज भासणार त्यांची इंपोर्टेड लेन्सची मोतीबिंदू शस्त्रक्रिया ना नफा ना तोटा या तत्त्वावर अत्यंत अल्पदरात डॉ. जुगल चिरानिया यांच्या हॉस्पिटलमध्ये करण्यात येईल. शिबिरादरम्यान कोरोना योद्धे आणि कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कारसुद्धा करण्यात आला आहे. शिबिराचा 300 च्या वर रुग्णांनी लाभ घेतला अशी माहिती आयोजक दिनेश बजाज आणि सुनील इंगळे यांनी दिली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close