बुलडाणा

लोणार-नागपुर मुंबई राज्यमहामार्गावरील अपघातात दोन युवक जागीच ठार

संगमनेर /संदीप मापारी पाटील

खापरखेड घुले ता. लोणार-नागपुर मुंबई राज्यमहामार्गावरील बीबी पो स्टेशन अंतर्गत रामलखन धाब्याजवळ बीबी येथील दोन युवकांना आज दि १४ ‘डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता भरघाव पिकअपने समोरुन उडवल्याने दोन युवक जागीच ठार झाल्याची घटना घडली याबाबत असे की, बीबी येथील प्रकाश रामकिसन वानखेडे वय ४२ वर्ष व भगवान श्रीराम चव्हाण वय ३३ वर्ष रा हत्ता हे दोघे आज सायंकाळी मेहकर-सिंदखेड राजा राज्यमहामार्गावरून   एम ऐच २८ बी जे ३६०६ या दुचाकीने  शेतातून बीबी घरी येथे येत असतांना रामलखन धाब्याजवळ पिकआप क्र एम २१ बी एच १२३२ ने  समोरासमोर जबर धडक दिल्याने यात दुचाकीस्वार दोन्ही युवक जागीच ठार झाले, प्रकाश वानखेडे यांना २ मुल व एक मुलगी आहे तर भगवान चव्हाण यांना एक मुलगी व एक मुलगा आहे. अपघातातील पिकअप चा शोध सुरु  असल्याची माहीती पोलिसांनी दि ली याबाबत बीबी पोलीस स्टेशन मध्ये ३०४(अ),२७९ भादवी नूसार गून्हा दाखल केला असून  अधीक तपास  बीबी ठाणेदार लहू तावरे यांच्या मार्गदर्शनात पो काँ सुभाष गिते, पंडीत नागरे, मोहमंद परसुवाले टेकाळे हे करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close