नाशिक

बावपठार येथे बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार

संगमनेर/अमोल भागवत

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नांदुरखंदरमाळ शिवारातील विठ्ठलराव भागवत या शेतक-याची कालवड बिबट्या ने ठार केल्या ची घटना गुरुवारी दि. 10 डिसेंबर रोजी रात्री घडली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून बिबट्या ला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने त्वरित पिंजरा लावावा अशी मागणी शेतकरी करीत आहे. बावपठार या ठिकाणी विठ्ठलराव भागवत हे शेतकरी राहात आहे.  नेहमी प्रमाणे त्यांनी शेड जवळ गुरुवार रात्री सगळे गाया बांधून घरी गेले होते. नेहमी प्रमाणे पहाटे दूध काढण्यासाठी गेले असता बिबट्या ने कालवडीवर हल्ला केल्याचे लक्षात आले.  त्यांनी वनविभागाचे रोहिदास भोईटे यांना फोन करून कळविले. त्यांनी घटना स्थळी जावून मृत कालवडीचा पंचनामा केला. यावेळी विठ्ठलराव भागवत, रावसाहेब भागवत,  रखमा भागवत, राहुल भागवत या शेतकऱ्यांनी बिबटय़ा ला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने त्वरित पिंजरा लावावा अशी मागणी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close