महाराष्ट्र

अखेर ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर, आजपासून आचार संहिता लागू

औरंगाबाद/प्रतिनिधी

आज महाराष्ट्रातील एकूण ३४ जिल्ह्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहे, व आज दिनांक ११ डिसेम्बर रोजी पासून  आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. व १५ जानेवारी रोजी निवडणूका घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

निवडणुका कार्यक्रम असा असेल

१) या निवडणुकांसाठी नावनिर्देशनपत्रे २३ डिसेम्बर ते ३० डिसेम्बर या कालावधीत स्वीकारली जाईल.

सरकारी सुट्टीच्या दिवशी नावनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाही.

२) छाननी ३१ डिसेम्बर २०२० रोजी होईल.

३) नावनिर्देशनपत्रे ४ जानेवारी २०२१ पर्यंत मागे घेता येतील  व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल.

४) मतदान १५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत होईल,

५) मतमोजणी १८ जानेवारी २०२१ रोजी होईल.

निवडणूक विषयी सूचना व निर्देश

मार्च २०२० दरम्यान कोविड-१९ च्या साथीच्या आजाराच्या संसर्गाची गंभीर परिस्थिती उद्भवल्याने मार्च २०२० मध्ये होणार्या सुमारे १५६६ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका ( माहे एप्रिल २०२० ते जून २०२० मध्ये मुदत संपलेल्या ) आयोगाच्या दि १७/०३/२०२० च्या आदेशाने स्थगित करण्यात आल्या होत्या.

आता आयोगाच्या दि 20/११/२०२० चे आदेशान्वये माहे एप्रिल २०२० ते डिसेम्बर २०२० मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम सुरु आहे. या कार्यक्रमानुसार संबधित जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार दि १/१२/२०२० रोजी सुमारे १४२३४ ग्राम्पान्चायातींसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून दिनांक ७/१२/२०२० पर्यंत त्यावर हरकती घेण्यात आल्या आहे. दिनांक ९/१२/२०२० च्या सुधारित कार्यक्रमानुसार अंतिम मतदार यादी दि १४/१२/२०२० रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

निवडणुका असलेल्या  ग्रामपंचायतीमध्ये, सदर निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील. या क्षेत्रातील मतदारावर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती/ घोषणा मंत्री, खासदार, आमदार व संबधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकार्यांना आचारसंहिता कालावधीत कुठेही करता येणार नाही.

या निवडणुकांसाठी नाव निर्देशानाची प्रक्रिया संघानक प्रणालीद्वारेच राबविण्यात यावी. आयोगाच्या दि ५ फेब्रुवारी २०२० चे पत्र व त्यासोबतच्या सापत्रान्वये संघानक प्रणालीतून नामनिर्देशनाची प्रक्रिया पार पडण्यासाठी सविस्तर निर्देश दिलेले आहेत. या निर्देशांचे काटेकोरपणे पालन केले जाईल याची संबधित जिल्हाधिकारी, तहसीलदार व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घ्यावी.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close