वर्धा

गरीब घराण्यातील मुलीने परिस्थितीवर मात करत मिळवली शासकीय नोकरी

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हिंगणघाट, येथिल प्रशिक्षणार्थी

हिंगणघाट/प्रतिनिधी

आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो विचार बदला आयुष्य बदलेल,असेच आज तालुक्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हिंगणघाट, येथील नयन तांदुळकर या मुलीने वेल्डर व्यवसाय प्रशिक्षण घेऊन मुंबई मेट्रो मध्ये टेक्निशीयन, या शासकीय पदाची नोकरी मिळविली.मुलांनी आपल्या स्तरावर रोजगारासाठी मेहनत घेतली तर नयन सारखा आदर्श घडवूशकतो. वेल्डर प्रशिक्षणा बद्दल काही प्रशिक्षणार्थी मध्ये गैरसमज आहे. डोळे खराब होणे आणि  प्रशिक्षणा दरम्यान लोखंड खूप घासाव लागत हा चूकीचा गैरसमज मुलांमध्ये व पालकांमध्ये आहे. या व्यवसायाला चांगली मागणी आहे.  नयन ही मुलगी मुलांच्या बरोबरीने मेहनत आणि जिद्दीने  तिने प्रशिक्षण पुर्ण केले. हा व्यवसाय करण्याचे धाडस केले. व तीच्या जिवनाचे  सोने झाले. जिद्द आणी मेहनत असली की कोणतीही गोष्ट अशक्य नाही. हे तिने सिध्द करून दाखविले, आई वडीलांच्या मोल मजूरीवर कसे तरी घरचालायचे, असे गरिबीचे चटके सहन करून आपल्या गरीबीवर मात करत आज नयनने तीच्या आई वडीलांची मान उंचाविली सोबत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हिगणघाटचा आदर्श कायम केला. मित्रांनो व्यवसायाला प्रवेश घेतांना रोजगार मिळेल ही आशा असते. नोकरी लागेल या आशेवर वेल्डर व्यवसाय निवडला, 12वी विज्ञान शाखेत शिक्षण होऊनही पैशाची अडचण होती. म्हणून पुढचे शिक्षण थांबविले, आणि वेल्डर व्यवसाय प्रशिक्षण प्रवेश घेतला. २०१८ मध्ये एक वर्षाच प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर २०१९ मध्ये दक्षिण रेल्वेत मदूराई येथे एक वर्षाची अप्रेन्टिशीप पुर्ण केले. या साठी वेळो वेळी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हिंगणघाट,चे प्राचार्य राकेशकुमार कोडापे यांनी तिला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केले. संस्थेतील मुलामुलींना रोजगार उपलब्ध होण्यासाठी प्राचार्य नेहमी नवीन उपक्रम, संस्थेत होणा-या कॅम्पस मुलाखत प्रशिक्षण व कॅपस टु कार्पोरेट ट्रेनिंगचा मला खुप उपयोग झाला.माझे आईवडील व  वेल्डर चे प्रशिक्षक एम.एच.गायकवाड यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली हे शक्य होऊ शकले.तसेच संस्थेतील इतरशिक्षकांनी मला खूप मोलाचे मार्गदर्शन केले. संस्थेतील व्यवसाय प्रशिक्षण कुठले पण असो त्याचे एक वेगळेच महत्त्व आहे. तुमची जिद्द व चिकाटी असली की यश हे मिळते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close