औरंगाबाद

विनायक माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनीची एमबीबीएस ला निवड

वाळूजमहानगर/प्रतिनिधी

विनायक माध्यमिक विद्यालय जोगेश्वरीच्या विद्यार्थ्यांनीची एमबीबीएस ला निवड श्री विनायक माध्यमिक विद्यालय जोगेश्वरी ता .गंगापूर जि. औरंगाबाद या शाळेतील कु.रोशनी बाळासाहेब घोडगे या वर्षी  झालेल्या NEET परीक्षेत घवघवित यश संपादन करून एमबीबीएस शिक्षणास पात्र झाली आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाकिची असतांना देखील आपल्या मुलांना मोठं करण्याची जिद्द उराशी बाळगनाऱ्या बाळासाहेब घोडगे यांचे स्वप्न हे सत्यात उतरतांना गावकऱ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले, तिच्या या यशस्वी वाटचाली मागे तिला अध्यापन करणारे विज्ञान शिक्षक राधाकृष्ण बिघोत(राजपूत) यांचा मोठा सहभाग आहे, तसेच या यशा बद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

यावेळी शाळेचे सचिव बालचंद देवकते, मुख्याध्यापक अतुल बल्लाळ, आर.एल .कुकलारे, के.एन.विसपुते, उज्वला कानेरकर, तसेच केशव गवते आणि संतोष नऱ्हे यांनी पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close