औरंगाबाद

वैजापूर तालुक्यातील १३५ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांची आरक्षण सोडत 

महालगाव/प्रतिनिधी

औरंगाबाद /वैजापूर-२०२०ते २०२५ या कालावधीसाठी तालुक्यातील १३५ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांची आरक्षण सोडत आज येथील विनायकराव पाटील महाविद्यालयाच्या सभागृहात काढण्यात आली. किशोर खंडागळे व सौंदर्या हाडोळे या मुला- मुलीच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या.यावेळी १३५ पैकी ६९ सरपंच पद हे महीला साठी राखीव झाले.अनुसुचीत जातीसाठी १४ जागा राखीव झालेल्या. त्यातील ९ जागा महीला साठी राखीव आहेत.अनुसुचीत जमाती साठी ७ जागा राखीव झालेल्या. त्यातील चार जागा महीला साठी राखीव आहेत.नागरीकांच्या मागास प्रवर्गासाठी ३७ जागा राखीव झाल्या असून त्यातील १९ जागा महीला साठी राखीव आहेत.सर्वसाधारण महिलांसाठी ३९ जागा राखीव झाल्या असून उर्वरीत म्हणजेच ३८ जागा सर्वसाधारण प्रर्वगासाठी आहेत. अनुसुचीत जाती व अनुसूचित जमाती साठी राखीव जागांचे आरक्षण हे लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने काढण्यात आले आहे. तहसिलदार राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही सोडत काढण्यात आली. या सोडत प्रसंगी आमदार रमेश बोरनारे, उपनगराध्यक्ष साबेर खान, नायब तहसीलदार महेंद्र गिरगे आदींसह नागरीकांची उपस्थिती होती.

ग्रामपंचायत निहाय सरपंच पदाचे आरक्षण पुढील प्रमाणे

अनुसुचीत जाती – बळेगाव, कोल्ही, भायगाव वैजापूर, शिऊर, भादली, लोणी खुर्द, मालेगाव कन्नड, अनुसूचित जाती महीला-लाख खंडाळा, शिरसगाव, परसोडा, शिवराई, सुराळा, नांदगाव, नांदूरढोक,

अनुसूचित जमाती-टुणकी,बाजाठाण,खंडाळा,

अनुसूचित जमाती महीला-पिंपळगाव खंडाळा,शिवगाव ,चिकटगाव,चांडगाव

नागरिकांचा मागास प्रवर्ग – पुरणगाव,टेंभी,आलापूरवाडी, गाढे पिंपळगाव, साकेगाव, वाकला, सावखेडगंगा, डोणगाव, जरूळ, भालगाव, फकीराबादवाडी, लोणी बु, माळी घोगरगाव जातेगाव, निमगाव, भायगावगंगा, विरगाव, भिवगाव

नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला राखिव-वैजापूर ग्रामीण एक, बोरसर, आघूर, भऊर, नालेगाव,पोखरी, भोकरगाव, लाखगंगा, संवदगाव, अव्वलगाव, कविटखेडा, नारळा, कांगोरी, बाभुळगाव बु, झोलेगाव, बेलगाव, संजरपूरवाडी, सफीयाबादवाडी, पारळा

सर्वसाधारण-हाजीपूरवाडी,चेंडुफळ,नायगव्हाण,बाभुळतेल,शहाजतपूर,मनेगाव,बेंदवाडी,मनूर,जानेफळ,देवगाव शनी,लाखणी,पालखेड,करंजगाव,जिरी,बल्लाळी सागज,लासूरगाव,मांडकी,टाकळीसागज,हडस पिंपळगाव,भग्गाव,महालगाव,हिलालपूर, डाग पिंपळगाव,बाबतारा,भिंगी,खिर्डी,नांदी,भगूर,भटाणा,पानवी खुर्द,डवाळा,दहेगाव,रघूनाथपूरवाडी, खंडाळा,वडजी,पेंडेफळ,अगरसायगाव, वैजापूर ग्रामीण दोन

सर्वसाधारण महीला-म्हस्की,कापूसवाडगाव,सटाणा,तलवाडा,धोंदलगाव,सावखेड खंडाळा,वाघला,बाभुळखेडा,राहेगव्हाण,सुदामवाडी,सुदामवाडी,एकोडीसागज,जांबरगाव,जळगाव,आंचलगाव,चोरवाघलगाव,लाडगाव,नगिना पिंपळगाव, खरज, गोळवाडी, माळीसागज, घायगाव, अमानतपुरवाडी, गारज,चिंचडगाव, नागमठाण, हिंगोली, चांदेगाव, बाभुळगाव खुर्द,गोयगाव,बिलोणी,पाशवी खंडाळा,हनुमंतगाव,पानवी बु,तिडी, वांजरगाव, कनकसज, रोटेगाव, हिंगणे कन्नड,पानगव्हाण आदी गावे आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close