औरंगाबाद

गंगापूरमध्ये भारत बंद ला विविध संघटनेचा पाठिंबा

गंगापूर/प्रतिनिधी

केंद्र सरकारले लादलेल्या तीन कृषी विधेयकांना विरोध करण्यासाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभरातील विविध शेतकरी संघटनांसह विविध राजकीय पक्षांनी पुकारलेल्या दि. ८ रोजीच्या भारत बंद आंदोलनानिमित्त आज गंगापूर बंद ला विविध शेतकरी संघटनेसह विविध राजकीय व सामाजिक, फळ विक्रेता संघटना, आदी  संघटनेने पाठिंबा दर्शवला आज सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सीमा नायक, व अमीना शेख, बुरान, यांच्या हस्ते बळीराजाचे पूजन करून आंदोलनस सुरुवात झाली. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून  व्यापा-यानी स्वाताहुन, उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला , यानंतर तहसीलदार यांना शेतकऱ्या विषयी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आज या आंदोलनाला काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना,एम आय एम,वंचित बहुजन आघाडी,प्रहार शेतकरी संघटना,मनसे शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी, रिपब्लिकन सेना, जमाते उलमा ए हिंद,वकिल संघ,व्यापारी महासंघ, डॉक्टर असोसिएशन,संस्था,मित्र मंडळ, फळ विक्रेता संघटना शेतकरी कृती समिती गंगापूर तालुका यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी गंगापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close