औरंगाबाद

घरगुती भांडणातून मुलाची गळफास तर बापाची दुसर्या दिवशी औषध पिऊन विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

महालगाव/ प्रतिनिधी

तालुक्यातील गोयगाव येथील कागोणी शिवारातील गट क्र 40 मध्ये राहत असलेल्या मुलाने गळफास घेऊन तर दुसर्या दिवशी बापाने औषध पिऊन विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी व गुरूवारी  रात्री घडली याबाबत अधिक माहिती अशी की गोयगाव येथील सुरेश कैलास मोटे वय 22 व कैलास अप्पासाहेब मोटे वय 55 या बाप लेकाचें घरगुती कारणावरून दोन ते तीन  दिवसापूर्वी वाद झाले यानतंर मुलगा सुरेश घरातुन निघुन गेला गुरूवारी  गट क्र 40 येथील तलावाजवळ झाडाला गळफास लावून सुरेश याने आत्महत्या केल्याचे उघड झाले  मुलाचा गुरूवारी रात्री  अत्यविधी झाल्यावर बाप कैलास मोटे हे त्याअगोदर  घरातुन बेपत्ता होते त्याच्या मोटारसायकल जवळ औषधांचा डबा तर शेजारील विहीरीवर कैलास याच्या चपला आढळल्या यावेळी वाजंरगाव येथील जलतरून सुरेश लहिरे सुभाष लहिरे व कागोणी  पोलिस पाटील मच्छिद्र धनाड व ग्रामस्थांच्या मदतीने शुक्रवारी उशीरा कैलास यांचा मृतदेह विहिरीतुन बाहेर काढण्यात आला यावरून घरगुती कारणावरून दोघांनी आत्महत्या केल्याचे तपासात समजले व पोलिस पाटील यांनी सांगितले यामुळे  बाप व लेकाने जिवन संपविल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे  याप्रकरणी वैजापुर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची  नोंद करण्यात आली आहे व पुढील तपास वैजापुर पोलिस करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close