अमरावती

गोविंदपुर येथिल स्वस्त धान्य दुकानात ९२ क्विंटलचा घोळ

चांदूरबाजार/प्रतिनिधी

चादुरबाजार तालुक्यातिल गोविंदपुर या ठिकाणी रास्त भाव दुकानात मोठ्या प्रमानात घोळ होत असल्याने तेथिल ग्रामपंचायत सदस्य अरविंद मोतिराम धामडे यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी अमरावती यांचे कार्यालयात लेखी तक्रार दिली. जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे पत्राचे अनुषंघाने तालुका पुरवठा अधिकारी शैलेश देशमुख यांनी गावातिल एकुन ८८ शिधापत्रीका धारक यांचे बयान घेतले तपासात अनेक सदोष प्रकरण पुढे आले कोरोणाचा प्रसार होवू नये म्हणून  प्रतिबंधात्मक उपाय आधार प्राधिकरण सवलत देण्यात आली. याचा गैरफायदा घेत प्राधान्य गटाच्या लाभार्थीना पावत्या न देताच धान्य वाटप करण्यात आले. तपासाअति नियमित धान्य वाटपात गहु ३३,६९ क्विंटल तांदुळ ४२,२० सागर १,९६ क्विंटल तर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतिल गहु ६,१२क्विंटल तांदुळ ७,४८ क्विंटल चनादाळ १८ किलो इतका मोठ्या प्रमानात अपहार व दुकानात शिल्लक व प्रत्यक्ष धान्य साठा यामध्ये गहु २० किलो तांदुळ २५ किलो इतका कमी असल्याचे आढळून आले. तपासाअति व लाभार्थी यांचे बयानावरुन त्यांना आतापर्यन्त कमी दिलेले व नियमित मोफत योजनेतिल धान्य साखर दाळ विचारात घेता दुकानात एकून ४०,०१ क्विंटल गहु ४९,९३ क्विंटल तांदुळ १,९६ क्विंटल साखर १८ किलो चनादाळ इतक्या मोठ्या प्रमानात धान्य अपहार झाल्याचे निष्पंन झाले तसेच स्वस्त धान्य दुकान प्राधिकरण पत्र धारक विजय ओंकारराव सुताने यांचे कडुन अपहारीत धान्याची बाजारभावाने वसुली करुन परवाना रद्द करणेबाबतचा अहवाल तालुका पुरवठा निरिक्षक शैलेश देशमुख यांनी दिला असून सदर प्रकरण जिल्हा पुरवठा अधिकारी अमरावती यांचे कड़े वर्ग करण्यात यावे असा अहवाल तहसिलदार धीरज थुल यांचे कड़े सुपुर्द करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close