औरंगाबाद

अंबादास ढोके क्रांतीबा जोतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

औरंगाबाद/प्रतिनिधी

क्रांतीबा जोतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार -2020 साठी अंबादास प्रितम ढोके कै. देवराव पाटील मा. निवासी आश्रमशाळा, औरंगाबाद यांना नुकताच मुप्ता संघटनाकडून निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे. यानिवेदानात मुष्टा संघटनेच्या परिवर्तनवादी शिक्षक चळवळीकडून मिळणाऱ्या या पुरस्काराचे आपण मानकरी ठरल्यामुळे आपण बीड येथील यशवंतराव चव्हाण नाटयगृहात मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित होत आहात, लवकरच समारंभाची वेळ व दिनांक आपणास कळविण्यात येईल. हा पुरस्कार स्विकारताना आपल्या सोबत आई- वडील, कुटुंबातील इतर सदस्य, आप्तेष्ट आणि मित्र परिवार विचारमंचावर घेवून येण्याची संधी मुप्टा संघटना आपणांस जाणीवपूर्वक देत आहे. परिवर्तनाच्या चळवळीत सक्रिय राहून यापुढेही सामाजिक ऋण फेडण्यासाठी हा पुरस्कार प्रेरणादायी ठरावा, ही अपेक्षा. असे सांगण्यात आले. या पुरस्काराबद्दल अंबादास ढोके यांचे सर्व स्तरावर स्वागत होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close