अमरावती

ट्रॅक्टरवर आदळली स्विफ्ट कार; गुरुकुंज मोझरी येथील घटना

अमरावती/सचिन ढोके

अमरावती- नागपूर महामार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या लाकडाच्या ट्रॅक्टरवर नागपूरवरून अमरावतीकडे जाणारी भरधाव स्विफ्ट कार धडकली. या अपघातात कारमधील 5 जण जखमी झाले. असा झाला अपघात -भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथील दातीर कुटुंबीय हे मोझरीकडून अमरावतीकडे एका लग्न समारंभाच्या कार्यक्रमात स्विफ्ट कारने (क्र. MH-36,H-6218) जात होते. यावेळी अचानक गुरुकुंज मोझरी येथील दासटेकडी फाट्यावरून लाकडाने भरलेला ट्रॅक्टर (क्र. MH-27,D-6395) महामार्ग ओलांडत होता. या ट्रॅक्टरवर भरधाव वेगात असलेली स्विफ्ट कार धडकली.जखमींची नावे -या अपघातात कारमधील रविंद्र किशोर दातीर (वय 58, रा.लाखनी, जि. भंडारा), वनिता रविंद्र दातीर (वय 52), अथर्व रविंद्र दातीर (वय 17), अंकिता रविंद्र दातीर (वय 28), वैभव मुकेश दातीर (वय 22, रा.जरूड) हे जखमी झाले आहे. त्यांच्यावर गुरुकुंज मोझरी येथील श्रीगुरुदेव आयुर्वेद रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.घटनेची माहिती तिवसा पोलिसांना मिळताच ठाणेदार राजेश पांडे, रोशन नंदरधने, सुनील बनसोड, अरविंद गावंडे, खंडारे, दीपक सोनाळेकर हे घटनास्थळी दाखल पोहोचले. याप्रकरणी अपघातातील ट्रॅक्टरला ताब्यात घेण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close