औरंगाबाद

कर्जाबाराजाला व नापिकाला कंटाळून शेतकर्यांनी विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या

गंगापूर/प्रतीनीधी

गंगापुर येथील ३८ वर्षीय सलीम ईस्माईल शेख या शेतकऱ्याने नापीकीला व कर्जबाजारीपणास कंटाळून शहरालगत असलेल्या गट क्रमांक ६६  मधिल विहिरीत ऊडी घेऊन आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली आहे ही घटना २४ नोव्हेंबर रोजी ऊघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या सोयाबीन, मुग, उडीद, कपाशी, आदी पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. अतिवृष्टिमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सततच्या नापीकीला व कर्जबाजारी पणाला कंटाळून गंगापुर येथील रहिवासी सलीम ईस्माईल शेख या शेतकऱ्याने सोमवारी रात्री शहराजवळ असलेल्या गट क्रमांक ६६ येथील शेतातील विहिरीमधे ऊडी घेऊन आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली सलीम हा दोन दिवसापासून गायब होता २४ नोव्हेंबर रोजी ही माहिती सकाळीं नातेवाईकांना समजताच गंगापूर पोलीस ठाण्याचे पो. हे .काँ .गणेश खंडागळे यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने मृतदेहास बाहेर काढण्यात आले, व गंगापूर ऊपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित करत स्ववविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close