औरंगाबाद

जीवनात गुरु शिवाय उद्धार होऊ शकत नाही- शांतिगिरी महाराज

गंगापूर/प्रतीनीधी

आपल्या जीवनात गुरु शिवाय उद्धार होऊ शकत नाही अनुष्ठानाची  परंपरा सुरुवात करण्यात आली आहे, प्रत्येक मातेनी स्री धर्म पाळला पाहिजे पतीचा आदर सेवेला सादर डोक्यावर पदर नित्यनियमाने केले पाहिजे.असे आवाहन शांतगिरीजी महाराज यांनी केले. जगद्गुरु जनार्दन स्वामी यांच्या ३१ व्या पुण्यस्मरणानिमित्त संपन्न होणाऱ्या विश्वशांती धर्म संस्कार सोहळ्याच्या प्रचारार्थ भक्ती फेरीचे आयोजन शांतिगिरीजी महाराज यांचा दर्शनाचा व प्रवचनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाराज बोलत होते. गंगापूर शहरातील सावता महाराज मंदिर, कायगाव रोड येथे प.पू.महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या दर्शनाचा व प्रवचनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी नगरसेवक अविनाश पाटील यांनी शांतिगिरी महाराज यांचे पूजन केले तर डॉक्टर आबासाहेब शिरसाठ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आपल्या यशामागे महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांचा खूप मोठा वाटा असून नित्यनियमाने आपण त्यांची निरंतर सेवा करत राहू असे सांगीतले. यावेळी नगरसेवक अविनाश पाटील,डॉक्टर आबासाहेब शिरसाट, जि.प सदस्य वालतुरे, ठोंबरे वकील,वाल्मीक शिरसाट,चेअरमन आनंद बाराहाते पाटील, योगेश पाटील बाजीराव पाटील, अरुण वाकडे, दिनकर जाधव, डी व्ही चव्हाण, नंदकिशोर जाधव, संतोष पाटील,लक्ष्मण लगड, गोविंद वल्ले,सुरेश साळुंखे, करण खोमणे,नवनाथ कानडे, इत्यादी गंगापूर शहर व तालुक्यातील महिला पुरुष  प्रवचनाचा लाभ पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी घेतला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कॉपी करू नये
Close
Close